दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. दक्षिण अफ्रिकेने या सामन्यात सात विकेट्स राखून विजय मिळवला आणि कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज अजिंक्य रहाणे (ajikya rahane) आणि चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) यांच्यासाठी हा सामना अखेरची संधी मानला जात होता. या दोघांनी सामन्याच्या दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली आणि १११ धावांची भागीदारी देखील साकारली. भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी पुजारा आणि रहाणेच्या प्रदर्शनानंतर त्यांचे कौतुक केले आहे.
वरिष्ठ खेळाडूंवर विश्वास दाखवला पाहिजे
प्रसारण वाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले की, “ते अनुभवी आहेत आणि त्यांनी मागच्या काळात संघासाठी जे काही केले, त्यामुळे संघानेही त्यांचे समर्थन केले. त्यांना स्वतःवर विश्वास होता की, ते चांगले प्रदर्शन करतील आणि त्यांनी केलेसुद्धा. कधीकधी आपण आपल्या वरिष्ठ खेळाडूंसोबत थोडी कडक वर्तणूक करू शकतो. कारण, तुमच्याकडे असलेले युवा खेळाडू वाट पाहत आहेत आणि आपल्या सर्वांना त्यांना थोडे खेळताना पाहायचे आहे. परंतु जोपर्यंत वरीष्ठ खेळाडू चांगले खेळत आहेत आणि वाईट पद्धतीने बाद होत नाहीत. तर मला वाटते आपण त्यांच्यावर विश्वास दाखवला पाहिजे.”
भारताचा नियमित कसोटी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नाही. याविषयी बोलताना गावसकर म्हणाले की, “ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारताने एक कसोटी सामना गमावला, ज्यामध्ये विराट कोहली खेळला नव्हता. या संघाने सिडनीमध्ये एक सामना अनिर्णीत राखला होता. कदाचित ते जिंकलेही असते.”
सामन्याविषयी बोलताना गावसकरांनी भारतीय संघाने केलेल्या चुका दाखवून दिल्या. त्यांच्यामते डावाच्या सुरुवातीली डीन एल्गरला एक एक धाव देत गेल्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला. तसेच संघ क्षेत्ररक्षणात अधिक चांगले प्रदर्शन करू शकत होता. सामन्यातील पराभवाविषयी ते म्हणाले, मला नाही वाटत की भारताने हा सामना गमावला. कारण, दक्षिण अफ्रिकेने हा सामना जिंकला.
महत्वाच्या बातम्या –
राहुल द्रविड घेणार रिषभ पंतची शिकवणी? वाचा काय म्हणाले मुख्य प्रशिक्षक
अजबच! चेंडू स्टम्पला लागला, अंपायरनेही आऊट दिले होते, तरीही स्टोक्सला मिळाले ‘असे’ जीवदान
व्हिडिओ पाहा –