भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील दिसणार आहेत. जे सध्या विश्रांतीवर आहेत. अलीकडेच रोहित-विराट देखील श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिका खेळलेल्या टीम इंडियाचा भाग होते. मात्र या मालिकेत टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. 27 वर्षांनंतर भारताने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली. बांग्लादेशविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रोहित-विराटबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
बांग्लादेश कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा दुलीप ट्रॉफीमध्ये खेळायला हवे होते. असा दावा सुनील गावस्कर यांनी केला आहे. कोहली आणि रोहित 5 सप्टेंबर 2024 पासून अनंतपूर, आंध्र प्रदेश आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी अनुपस्थित असणार. स्टार फलंदाजांव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांनाही स्पर्धेतून विश्रांती देण्यात आली आहे. या दुलीप ट्राॅफीसाठी दोन्ही (रोहित-विराट) फलंदाजांची निवड व्हायला हवी होती, असे गावस्कर यांचे मत आहे.
आपले मत व्यक्त करताना, गावसकर म्हणाले की, दोन्ही (रोहित-विराट) फलंदाजांना स्पर्धेसाठी निवडले गेले पाहिजे होते, कारण ते दोघेही 30+ आहेत आणि त्यांचे मन ताजे ठेवण्यासाठी सामना सराव आवश्यक आहे. तो पुढे म्हणाला, ‘निवडकर्त्यांनी दुलीप ट्रॉफीसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड केलेली नाही. त्यामुळे बहुधा ते बांग्लादेश कसोटी मालिकेत जास्त सामना सराव न करता प्रवेश करतील.
यजमान संघ बांग्लादेश भारताविरुद्ध 2 कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी तर दुसरा सामना 27 सप्टेंबर -1 ऑक्टोंबर दरम्यान खेळवली जाईल. त्यानंतर 3 सामन्यांची टी20 खेळवली जाणार आहे. जे की 6 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर दरम्यान होईल. या मालिकेपूर्वी टीम इंडियाला जवळपास 40+ दिवसांचा ब्रेक मिळाला आहे.
हेही वाचा-
‘बाबर आझमसारखा छंद..’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने जसप्रीत बुमराहला दिला सल्ला
‘मी देशाचा सर्वोत्कृष्ट स्पिनर…’, गुजरातच्या स्टारचे बीसीसीआयला आव्हान?
धोनीनंतर आता युवराज सिंगवर बनणार बायोपिक, हा अभिनेता साकारणार ‘सिक्सर किंग’ची भूमिका!