भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना बुधवारी (१९ जानेवारी) खेळला गेला. पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिने ३१ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (bhuvaneshwar kumar) काही काळापूर्वी भारतीय संघाचा महत्वाचा भाग होता. पण अलिकडच्या काळात त्याला अपेक्षित प्रदर्शन करत येत नाहीये. भारताचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर (sunil gavaskar) यांनी याविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वरने नव्या चेंडूसह चांगली गोलंदाजी केली, पण शेवटच्या षटकांमध्ये त्याला धावा रोखता आल्या नाहीत. त्याने सामन्यात १० षटके टाकली आणि यामध्ये एकही विकट न घेता ६४ धावा खर्च केल्या. तसेच शार्दुल ठाकुरही संघासाठी खूप महागात पडला. त्याने टाकलेल्या १० षटकांपैकी एक निर्धाव होते, तरीही शार्दुलने ७२ धावा खर्च केल्या.
याच पार्श्वभूमीवर माजी दिग्गज सुनील गावसकरांनी त्यांच्या कॉलममध्ये लिहिले की, “भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकुर दोघांनी धावा खर्च केल्या. पण, ठाकुरने नाबाद अर्धशतक करून काही प्रमाणात याची भरपाई केली. मात्र, तेव्हा दक्षिण अफ्रिकेने दबाव कमी केला होता. मागच्या काही काळापासून भुवनेश्वर शेवटच्या षटकांमध्ये धावा रोखू शकलेला नाही, जसे तो करायचा.”
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी खेळपट्टीवर येत आहे. गावसकांच्या मते पंतने सहाव्या क्रमांकार फिनिशरची भूमिका पार पाडली पाहिजे. यासंदर्भात बोलताना गावसकर म्हणाले की, “शिखर आणि कोहलीच्या अप्रतिम भागीदारीचा फायदा पंत आणि अय्यर घेऊ शकले नाहीत. पंतला सध्या चौथ्या क्रमांकावर खेळवले जात आहे. ज्याठिकाणी तो व्यवस्थित फिट होत नाहीये. अशात त्याला सहाव्या क्रमांकावर वापरले जाऊ शकते. ज्याठिकाणी त्याला स्वतःचा स्वाभाविक आक्रमक खेळ खेळण्याचे स्वातंत्र मिळेल.”
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! बीसीसीआयमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक
रिषभ पंत, केएल राहुल यावर्षी होणार मालामाल? बीसीसीआयच्या वार्षिक करारात होऊ शकतो ‘हा’ फायदा
धक्कादायक! बिहार पोलिसांनी सचिनचा चाहता ‘सुधीर कुमार’ला चोपलं, वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा –