---Advertisement---

“आधी मुख्य खेळाडूंचे ब्रेक कमी करा”; सततच्या विश्रांतीवर भडकले गावसकर

Virat-Kohli-Rohit-Sharma-KL-rahul
---Advertisement---

बांगलादेश दौऱ्यापासून खऱ्या अर्थाने भारतीय संघाच्या 2023 वनडे विश्वचषक मोहिमेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाला या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे संघावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. त्याचवेळी ही मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघाचे माजी कर्णधार व समालोचक सुनील गावसकर यांनी एक अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती.

भारतीय संघाला नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघात मोठ्या प्रमाणात बदल करावे अशी मागणी होत आहे. तसेच संघाला पुढील वर्षी वनडे विश्वचषक खेळायचा आहे. त्या दृष्टीने संघाचे नियोजन देखील सुरू झाले आहे. भारतीय संघाच्या याच तयारीबाबत बोलताना सुनील गावसकर एका कार्यक्रमात म्हणाले,

“वनडे विश्वचषकाच्या अनुषंगाने संघात फार बदल होणार नाही अशी मी अपेक्षा करतो. तसेच खेळाडूंना जास्त विश्रांतीही दिली गेली नाही पाहिजे. कारण, एक संघ संयोजन बनण्यासाठी खूप वेळ लागतो. विश्वचषकातील एकही सामना गमावणे संघाला परवडत नाही. याच कारणाने तुम्ही तुमचा मुख्य संघ दरवेळी खेळवायला हवा.”

ते पुढे म्हणाले,

“तुम्हाला गरजेनुसार कधीतरी खेळाडूंना बदलावे लागते. मात्र, वारंवार विश्रांतीच्या नावे असे निर्णय घेणे चुकीचे वाटते.”

भारतीय संघाने आपला अखेरचा विश्वचषक 2011 मध्ये जिंकला होता. त्यानंतर झालेल्या दोन्ही विश्वचषकांच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.‌ या विश्वचषकाआधी भारतीय संघाला तब्बल 25 वनडे सामने खेळण्यासाठी मिळणार आहेत. तसेच विश्वचषक मायदेशात होत असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

(Sunil Gavaskar Said Extra Rest Not Needed For Core Players)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
या तीन कारणांनी अडले टीम इंडियाचे घोडे! बांगलादेशने दिली न भरून येणारी जखम
उर्वशी रौतेलाने अखेर मौन सोडले; म्हणाली ‘आरपी’ म्हणजे माझा…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---