भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज सलामी फलंदाज सुनील गावसकर यांनी संघातील भेदभावाबद्दल सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय संघाचे गोलंदाज आर अश्विन आणि टी नटराजन यांसारख्या खेळाडूसोबत भेदभाव केला जातो. कारण संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम आहेत.
एका इंग्रजी वेबसाईटच्या कॉलममध्ये गावसकर यांनी लिहिले, “मागील काही काळापासून अश्विनला संघर्ष करावा लागत आहे. त्याच्या गोलंदाजी क्षमतेत काही कमी आहे म्हणून नाही, तर यासाठी की तो संघाच्या बैठकीमध्ये आपले मत मांडतो. त्याच्याव्यतिरिक्त बाकी सर्व खेळाडू फक्त मान हलवतात. मग ते त्या गोष्टीशी सहमत असो किंवा नसो.”
गावसकर पुढे म्हणाले, “दुसर्या कोणत्याही देशात अशा गोलंदाजाचे स्वागत होते की, ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 350 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत आणि या गोष्टीलाही कधी विसरू नका, त्याने चार शतकेसुद्धा ठोकली आहेत. जर त्याने पहिल्या सामन्यात विकेट्स घेतल्या नसत्या, तर त्याला आरामात दुसर्या कसोटीमधून बाहेर केले असते. असे कोणत्याही स्थापित फलंदाजाबाबत केले जात नाही. जर तो फ्लॉप ठरला, तर त्यानंतरही पुढील सामन्यात त्याला संधी मिळते आणि पुन्हा पुन्हा संधी मिळत राहते. मात्र, अश्विनसाठी पूर्णपणे वेगळे नियम आहेत.”
“आणखी एक खेळाडू तुम्हाला नियमांना घेवून हैराण करेल, परंतु याबद्दल कोणीच आवाज उठवणार नाही. एक नवीन खेळाडू म्हणजे टी नटराजन, डाव्या हाताचा यॉर्कर खासियत असलेला, ज्याने टी-20 सामन्यात पदार्पण करताना सर्वांना प्रभावित केले. त्याचबरोबर हार्दिक पंड्याने त्याला आपला मालिकावीराचा पुरस्कार सुद्धा नटराजनला दिला. आयपीएलचे प्लेऑफ सामने सुरू असताना तो पहिल्यांदा वडील झाला आणि त्याला युएईतून सरळ ऑस्ट्रेलियाला घेऊन जाण्यात आले. त्याच्यानंतर उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला कसोटी मालिकेसाठी सुद्धा थांबवण्यात आले. परंतु कसोटी संघाचा भाग म्हणून नाही, तर फक्त नेटमध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून थांबवून घेतले. त्यामुळे तुम्ही स्वत: विचार करा,” असेही गावसकर पुढे बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ धुरंधर खेळाडू बनला तामिळनाडूचा कर्णधार; टी२० स्पर्धेत करणार नेतृत्त्व
माजी भारतीय दिग्गजाने निवडला भारत- ऑस्ट्रेलियाचा संयुक्त कसोटी संघ; विराटला दिला डच्चू