भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसोबतच एकदिवसीय मालिकासुद्धा गमावली आहे. एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना खुप रोमांचक झाला. तो सामना दक्षिण आफ्रिकेने आपल्या नावे केला असला, तरी भारतीय खेळाडूंनी सामना जिंकण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. भारत विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने ३१ चेंडूत अर्धशतक झळकावत शानदार फलंदाजी केली होती. चाहरच्या खेळीमुळे पिछाडीवर पडलेला भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला होता. पण चाहरच्या बाद होण्याने भारताला सामना गमवावा लागला आहे.
भारतीय संघाच्या पराभवानंतर दीपक चाहरसुद्धा खूप नाराज दिसला होता. त्याच्या खेळीचे सर्वानी कौतुक देखील केले, तर काही जणांनी त्याच्या शाॅट निवडीवरही टिका केली आहे. माजी सलामीवीर आणि अनुभवी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी दीपकच्या निष्काळजी शाॅटवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुनील गावसकर म्हणाले की, “आजकाल फक्त चौकार आणि षटकार मारूनच सामने जिंकले जातात, असं समजलं जात आहे. या सामन्यात सहजपणे मिळू शकणारा विजय आम्ही गमवला आहे.”
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सुनील गावसकर म्हणाले की, “ज्या पद्धतीने फलंदाजी शेवटच्या १० षटकांमध्ये झाली ती पाहून दक्षिण आफ्रिका संघाला सामना जिंकणे कठीण होईल, असे वाटले होते. पण दक्षिण आफ्रिका संघावर खुप दबाव होता. लुंगी एन्गिडीने अनेक धावा वाया घालवल्या होत्या. यानंतर आपण पाहिले की, गरज नसताना काही शाॅट आपण खेळलो. दीपक चाहरने चमकदार खेळी खेळली, पण त्याला आक्रमक शाॅट खेळण्याची काय घाई होती. तो सामना भारताने जवळपास जिंकला होता. आपल्याला १८ चेंडूत केवळ १० धावा हव्या होत्या. तो एका चेंडूत एक धाव काढून, पण सामना जिंकवू शकला असता. त्यावेळी मोठे शाॅट खेळण्याची गरज नव्हती.”
अधिक वाचा – धोनीनंतर ‘हा’ फलंदाज निभावू शकतो सर्वोत्तम फिनिशरची भूमिका, सुनील गावसकरांनी सुचवला पर्याय
पुढे सुनील गावसकर म्हणाले, “मी दीपक चाहरच्या चुका काढत नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की, आजच्या काळात खेळाडूंची अशी विचारधारा झाली आहे की, आपण फक्त षटकार आणि चौकार मारुनच सामने जिंकू शकतो. या विचारांमुळे हा सामना भारताच्या हातातून निसटला आहे.”
व्हिडिओ पाहा – पुजाराला त्याचे वडिल एका गोष्टीपासून कायम वाचवत होते
कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने २-१ ने नावे केली. यानंतर कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलला एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिन्ही एकदिवसीय सामने पराभूत झाला. केपटाउन येथे खेळला गेलेला तिसरा आणि शेवटचा सामना भारताने ४ धावांनी गमवला. आता भारताचा ६ फेब्रुवारीपीसून वेस्ट इंडीजसोबत एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलावात ‘या’ दोन परदेशी खेळाडूंवर असेल सर्वांचीच नजर; एक आहे बीबीएलचा सर्वोत्तम खेळाडू
आयपीएलमध्ये ‘या’ ५ फलंदाजांवर लागू शकते कोटींची बोली, १० संघांमध्ये रंगणार रंजक लढत