विराट कोहली याचे आयपीएल २०२२मध्ये निराशाजनक प्रदर्शन सुरूच आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल २०२२मधील ५४व्या सामन्यात कोहली गोल्डन डक झाला. चालू हंगामात विराटने केलेला हा तिसरा गोल्डन डक होता. विराटला सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयशी होताना पाहून बऱ्याच क्रिकेट दिग्गजांनी त्याला क्रिकेटमधून काही दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. परंतु माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांचे मत काही वेगळेच आहे.
विराटने विश्रांती (Virat Kohli Break From Cricket) न घेता त्याने कोणत्याही स्थितीत मैदान सोडले नाही पाहिजे, असे गावसकरांना (Sunil Gavaskar) वाटते. बेंगलोर विरुद्ध हैदराबाद (RCB vs SRH) संघातील सामन्यादरम्यान समालोचन करताना गावसकर बोलत होते.
माजी भारतीय दिग्गज गावसकर म्हणाले की, “जिथपर्यंत क्रिकेटमधून विश्रांती घेण्याची गोष्ट आहे, विराटने (Virat Kohli)भारतीय संघाचे सामने मिस नाही केले पाहिजेत. भारताचे क्रिकेट सामने ही त्याची पहिली प्राथमिकता असायला पाहिजे. माझ्या मते, जर तुम्ही खेळणारच नाही, तर तुमची लय कशी परत येईल. ड्रेसिंग रूममध्ये बसून राहिल्याने तुम्हाला तुमची लय परत मिळणार नाही. तुम्ही जितके जास्त क्रिकेट खेळाल, तितक्या तुमच्या लयीत परतण्याच्या शक्यता असतात.”
विराटने केला गोल्डन डकचा नकोसा विक्रम
हैदराबादविरुद्ध गोल्डन डक (पहिल्याच चेंडूवर एकही धाव न करता विकेट) झाल्यानंतर विराटच्या नावावर काही नकोसे विक्रम झाले आहेत. विराटने आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता बाद होण्याची ही तिसरी वेळ होती. तर एकंदर आयपीएलमध्ये तो एकूण ६ वेळा गोल्डन डक झाला आहे. २००८ साली आयपीएल खेळायला सुरू केलेला विराट २०२१ पर्यंत केवळ ३ वेळा गोल्डन डक झाला होता. याउलट आता आयपीएल २०२२मधील १२ सामन्यांमध्ये तो ३ वेळा गोल्डन डकचा शिकार बनला आहे.
आयपीएलमध्ये ६ वेळा गोल्डन डक होत विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा गोल्डन डक होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. त्याने या नकोशा विक्रमात गौतम गंभीर, पार्थिव पटेल, सुरेश रैना, एबी डिविलियर्स आणि आर अश्विन यांची बरोबरी केली आहे. हे सर्व फलंदाजही ६ वेळा आयपीएलमध्ये गोल्डन डक झाले आहेत.
सर्वाधिकवेळा आयपीएलमध्ये पहिल्या चेंडूवर एकही धाव न करता आपली विकेट गमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हरभजन सिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो ७ वेळा आयपीएलमध्ये गोल्डन डक झाला होता. तर राशिद खानच्या नावे हा नकोसा विक्रम आहे. तो आतापर्यंत सर्वाधिक १० वेळा गोल्डन डक झाला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पंचांमुळे वॉर्नर वाचवू शकला नाही आपली विकेट, बाद झाल्यानंतर असा व्यक्त केला राग- Video
‘द वाॅल’ राहुल द्रविड चक्क दिसणार भाजपच्या मंचावर, पाहा काय आहे नक्की प्रकरण?
सीएसकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बोलला पंत; म्हणे, ‘आमचे खेळाडू कोरोना आणि फ्लू आजाराने…’