क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणला जाणारा विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याला आयपीएल २०२२च्या चालू हंगामात साधे अर्धशतक करण्यासाठीही कित्येक सामन्यांची प्रतिक्षा करावी लागली आहे. अशात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध हंगामातील ५४ वा सामना खेळताना पुन्हा एकदा विराट चांगली खेळी करण्यात अपयशी ठरला. तो या सामन्यात गोल्डन डक झाला, ज्यानंतर त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
नाणेफेक जिंकून बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. बेंगलोरकडून विराट (Virat Kohli) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीसाठी आले होते. परंतु पुन्हा एकदा विराटच्या बॅटने त्याला दगा दिला. डावातील पहिल्याच चेंडूवर हैदराबादचा गोलंदाज जगदीश सुचीथ याने केन विलियम्सनच्या हातून त्याला शून्यावर झेलबाद (Virat Kohli Golden Duck) केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाचे म्हणजे, विराटने आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता बाद होण्याची ही तिसरी वेळ होती. तर एकंदर आयपीएलमध्ये तो एकूण ६ वेळा गोल्डन डक झाला आहे. २००८ साली आयपीएल खेळायला सुरू केलेला विराट २०२१ पर्यंत केवळ ३ वेळा गोल्डन डक झाला होता. याउलट आता आयपीएल २०२२मधील १२ सामन्यांमध्ये तो ३ वेळा गोल्डन डकचा शिकार बनला आहे.
A painful walk back to the dressing room for Virat Kohli. pic.twitter.com/ZDHOyIVc8P
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 8, 2022
अशाप्रकारे आयपीएलमध्ये ६ वेळा गोल्डन डक होत विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा गोल्डन डक होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. त्याने या नकोशा विक्रमात गौतम गंभीर, पार्थिव पटेल, सुरेश रैना, एबी डिविलियर्स आणि आर अश्विन यांची बरोबरी केली आहे. हे सर्व फलंदाजही ६ वेळा आयपीएलमध्ये गोल्डन डक झाले आहेत.
सर्वाधिकवेळा आयपीएलमध्ये पहिल्या चेंडूवर एकही धाव न करता आपली विकेट गमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हरभजन सिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो ७ वेळा आयपीएलमध्ये गोल्डन डक झाला होता. तर राशिद खानच्या नावे हा नकोसा विक्रम आहे. तो आतापर्यंत सर्वाधिक १० वेळा गोल्डन डक झाला आहे.
आयपीएलमधील सर्वाधिक वेळा गोल्डन डक होणारे फलंदाज:
१० – राशिद खान
७ – हरभजन सिंग
६ – विराट कोहली
६ – गौतम गंभीर
६ – पार्थिव पटेल
६ – सुरेश रैना
६ – एबी डिविलियर्स
६ – आर अश्विन
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विजयरथावर स्वार राजस्थान रॉयल्सला झटका, अर्ध्यातून मॅच विनर फलंदाजाची घरी रवानगी
कोलकाताचं चुकलं कुठं? लखनऊविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं कारण
केएल राहुल ‘डायमंड डक’चा शिकार, आयपीएल इतिहासातील नकोसा विक्रम केला नावे