जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात अनेक रंगतदार सामने पाहायला मिळाले. आयपीएलच्या नव्या हंगामात अनेक नवनवे नियम वापरले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता भारताचे माजी कर्णधार व प्रसिद्ध समालोचक सुनील गावसकर यांनी आणखी एका नियमाची सुरुवात करण्याचे सुचवले आहे.
सध्या गावसकर हे आयपीएलमध्ये समालोचन करत आहेत. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स सामन्यावेळी चेन्नईच्या गोलंदाजांनी बऱ्याच अवांतर धावा दिल्या. त्यावेळी गावसकर नाराज झाले. ते म्हणाले,
“गोलंदाजांना एक शिस्त असायला हवी. ज्यावेळी कोणताही गोलंदाज सलग दोन वाईड चेंडू टाकेल त्यावेळी थेट फ्री हिट देण्यात यावी. हा नियम लागू केल्यास गोलंदाज आपल्या लाईन आणि लेन्थवर लक्ष देतील.”
चेन्नईचा युवा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने पहिल्या षटकात तीन वाईड व दोन नो बॉल टाकले होते. त्यानंतर दीपक चहर याने देखील सलग 3 चेंडू वाईड टाकलेले. तर देशपांडे यांनी पुन्हा एकदा अखेरच्या षटकात अशाच प्रकारे स्वैर गोलंदाजी केलेली.
आयपीएलमध्ये यावेळी इम्पॅक्ट प्लेयर चा नियम वापरण्यात येत आहे. खेळाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रत्येक संघ एका खेळाडूला बदली करू शकतो. या नियमाचा सर्वच संघ फायदा उचलताना दिसत आहेत. त्यासोबतच नाणेफेकीवेळी कर्णधार दोन प्लेईंग इलेव्हन घेऊन मैदानावर उतरतायेत. अशा प्रकारचे नियम यावेळी आयपीएलमध्ये वापरले जातायेत.
(Sunil Gavaskar Suggest Give Free Hit After Two Sides)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंच नितीन मेननचं स्वप्न खरं होणार! पहिल्यांदाच करणार ‘या’ महत्वाच्या मालिकेत अंपायरिंग
दुखापतग्रस्त राज बावाच्या जागी पंजाब किंग्जमध्ये दमदार खेळाडूची एन्ट्री, फ्रँचायझीने मोजली एवढी किंमत