भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा चौथा कसोटी सामना 15 जानेवारी रोजी ब्रिस्बेन येथे होणार आहे. मात्र या सामन्यावर आता टांगती तलवार लटकत आहे. ब्रिस्बेन येथे कोरोना नियम फारच कठोर करण्यात आलेले आहेत व खेळाडूंवर बरीच बंधने लादली गेली आहेत. काही दिवसांपूर्वी हाती आलेल्या रिपोर्टनुसार भारतीय संघ पुन्हा एकदा लॉकडॉउन मध्ये जाण्याच्या तयारीत नसून खेळाडूंना ब्रिस्बेन येथील नियम मान्य नाहीत.
या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने देखील ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली आहे. बीसीसीआयच्या या प्रस्तावावर क्रीडा विश्वातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत .अशातच भारताचे दिग्गज क्रिकेट खेळाडू सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात समालोचन करत असताना गावसकर म्हणाले, “क्वींसलंड सरकार ज्याप्रमाणे आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी भूमिका बजावत आहे, त्याच प्रमाणे बीसीसीआय देखील आपल्या खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी आपली कामगिरी बजावत आहे. सिडनीत प्रेक्षक मैदानात सामना बघण्यासाठी येत आहेत व जाताना रेस्टॉरंटमध्ये जेवण देखील करत आहेत. किंवा पबमध्ये 20 ते 30 लोक एकत्र भेटत आहेत. जेव्हा खेळाडू दहा तास मैदानावर एकत्र घालवत असतील तर त्यांना हॉटेलमध्ये देखील एकत्र वावरण्याचा अधिकार असायला हवा.”
ब्रिस्बेन येथील नियमानुसार खेळाडूंना मैदानाबाहेर एकमेकांना भेटण्याची परवानगी नाही तसेच खेळाडूंना हॉटेल सोडून इतर बाहेर जाण्यावरही निर्बंध आहेत. हॉटेलच्या एका फ्लोरवर असलेले खेळाडूच एकमेकांशी भेटू शकतात, इतरांना ही सवलत नाही. आगामी काळात हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की चौथ्या कसोटी सामन्यात संदर्भात काय निर्णय घेतला जातो.
महत्वाच्या बातम्या:
भारताला नवीन स्टार मिळाला आहे, शुबमनच्या खेळीचे आजी-माजी खेळाडूंकडून कौतुक
मी शेतात जात राहिलो तर बाजारासाठी एकही स्ट्रॉबेरी उरणार नाही, पाहा धोनीने शेअर केलेला व्हिडिओ
पुजाराची संथ फलंदाजी आणि प्रेक्षकाने भर मैदानातच घेतली डुलकी!