---Advertisement---

अरे पव्हेलियन काय, अख्ख्या स्टेडियमलाच धोनीचं नाव द्या!

On: मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019 6:22 PM
---Advertisement---

रांची। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील तिसरा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रांची येथे पार पडला. या सामन्यात भारताने एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला.

हा सामना पार पडलेले हे स्टेडियम भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे घरचे मैदान आहे. त्याच्यामुळे रांचीला जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्यामुळे रांचीतील या स्टेडीयमला धोनीचे नाव दिले पाहिजे, असे मत माजी कर्णधार सुनील गावस्करांनी तिसऱ्या कसोटी दरम्यान समालोचन करत असताना मांडले होते. 

या स्टेडियममधील एका स्टँडला याआधीच धोनीचे नाव दिलेले आहे. परंतू आता स्टेडियमलाच धोनीचे नाव दिले जावे असे सांगताना गावस्कर म्हणाले, ‘या मैदानात धोनीच्या नावावर पॅव्हेलियन(स्टँड) आहे. परंतु, या मैदानाचे नावंच एमएस धोनी ठेवायला पाहिजे. कारण त्याने रांचीचं नाव क्रिकेटच्या नकाशावर आणले आहे.’

धोनीने कर्णधार म्हणून भारतीय संघाला आयसीसी विश्वचषकातील तीन महत्त्वाच्या स्पर्धेंचे विजेतेपद मिळवून दिले. 2007 मधील आयसीसी टी20 विश्वचषक, 2011 आयसीसी वनडे विश्वचषक आणि 2013 चँपियन्स ट्रॉफी या स्पर्धांचे विजेतेपद भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवले आहेत.

आयसीसीची तीन मोठी विजेतेपदे मिळवणारा धोनी हा जगातील पहिला आणि एकमेव कर्णधार आहे.

सध्या धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून मागील काही महिने दूर आहे. त्याने भारताकडून शेवटचा सामना इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळल्या गेलेल्या 2019 आयसीसी विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---