भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 280 धावांनी विजय मिळवला. आता दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये खेळला जात आहे. त्यातील पहिला दिवस संपला. या सामन्यात पावसाने देखील हजेरी लावली होती. तत्पूर्वी कानपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लिश मीडियावर नाराज होताना दिसले.
भारत-बांगलादेशमधील थेट सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना गावसकर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लिश मीडियावर सातत्याने भारतीय खेळपट्ट्यांवर टीका केली होती. कॉमेंट्री करताना त्यांनी इंग्लिश मीडियालाा ‘रडणारी बाळे’ म्हणत त्यांची खिल्ली उडवली.
कॉमेंट्री करताना गावसकर यांनी अश्विनच्या असामान्य कामगिरीचे कौतुक केले. यासोबतच इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान चेपॉक खेळपट्टीबाबत इंग्लिश मीडियाने केलेली टीकाही त्यांना आठवली. गावसकर म्हणाले, “अश्विनने पत्रकार परिषदेत खरे सांगितले की, जर तुम्ही स्वतःवर मेहनत घेतली, तर तुम्ही शतक करू शकता. त्यामुळे जेव्हा लोक ‘तुम्ही येथे फलंदाजी करू शकत नाही’ असे म्हणत होते, तेव्हा त्याने आपला शब्द पाळला. त्याने अश्रू आणणाऱ्या गोष्टी सांगितल्या, जे इंग्लिश मीडियाचे वैशिष्ट्य आहे, जिथे ते फक्त भारतीय खेळपट्ट्यांबद्दल बोलतात.”
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन दाखवले. या सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना ज्यावेळी भारताला गरज होती, त्यावेळी स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) शानदार शतकी खेळी केली होती. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने 6 विकेट्सही घेतल्या. त्याला सामनावीर पुरस्कार देखील देण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत
“आम्हाला कुणी ओळखलेसुद्धा नाही”, ऑलिम्पिक विजेत्या हॉकीपटूने मांडली मनातली खदखद
कर्णधार रोहितच्या जडेजाबाबतच्या ‘त्या’ निर्णयावरुन भडकले मांजरेकर, थेट आकडेवारीच मांडली