---Advertisement---

सुनील गावस्कर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा मुंबई इंडियन्सला होणार फायदा

On: बुधवार, फेब्रुवारी 14, 2024 12:49 PM
Sunil-Gavaskar-And-Rohit-Sharma
---Advertisement---

आयपीएलचा सतरावा हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. तसेच जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे सरकत आहे. तर आयपीएल 2024 साठी झालेल्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर ऐतिहासिक बोली लागली असून कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने स्टार्कला 24.75 कोटी रूपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले आहे.

याबरोबरच, मुंबई इंडियन्सला सर्वाधिक 5 जेतेपद जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला आता हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळावे लागेल, हेच अनेकांच्या पचनी पडलेले नाही आणि अजूनही या निर्णयावर ते नाराज आहेत. तसेच रोहितचं वय ( 36) आहे. हे पाहता हा निर्णय योग्य असल्याचेही अनेकांचे मत आहे. याबरोबरच रोहित शर्मा आयपीएलच्या 17व्या हंगामात सलामी फलंदाज म्हणून खेळताना बघायला मिळू शकतो. यावर भारतीय संघाचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

”हे बघा, ही फ्रँचायझी नेहमी भविष्याचा विचार करून निर्णय घेते. तसेच रोहित शर्मा हा आता ३६ वर्षांचा झाला आहे आणि भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटचा तो कर्णधार असल्याने त्याच्यावर प्रचंड दडपण आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्याच्यावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हार्दिकसारख्या युवा खेळाडूच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे,”असे सुनील गावस्कर यांनी म्हंटले आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले आहेत की, ”हार्दिक पांड्याकडे नेतृत्व देण्याचा मुंबई इंडियन्सला फायदा होणार आहे. त्याने रोहित शर्माला फलंदाज म्हणून मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळणार आहे. सलामीला रोहित खेळल्यानंतर 3 किंवा 5 व्या क्रमांकावर हार्दिक पांड्या फलंदाजी करेल आणि संघाला सातत्याने २०० पार धावा उभ्या करण्याचा प्रयत्न करेल.”

दरम्यान,  हार्दिकने 2015 मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तर त्याने 123 आयपीएल सामन्यांत 2309 धावा केल्या आहेत आणि 53 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच रोहितने 2022 मध्ये 120.18च्या स्ट्राइक रेटने 268 धावा केल्या, जेव्हा संघ गुणतालिकेत तळाशी होता. 2023 मध्ये त्याने 132.80च्या स्ट्राईक रेटने 332 धावा करून चांगली कामगिरी केली आणि संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाला होता.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---