---Advertisement---

आता मैदानाबाहेर वाकयुद्ध, एका विधानावरुन गावसकर अन् नासिरमध्ये जुंपली

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 9:41 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्समध्ये खेळला जात आहे. या मालिकेतील अनेक दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नेतृत्व गुणांनी खूप प्रभावित झाले आहेत. फक्त दोन कसोटी सामन्यांमध्ये प्रेक्षकांना बरेच काही पाहायला मिळाले, जे त्यांना कायम लक्षात राहील. सध्या सुरू असलेल्या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तणाव दिसून आला आहे आणि आता या दोन संघांच्या माजी खेळाडूंमध्येही वातावरण तापत आहे.

खरं तर, तिसऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनने विराटच्या कर्णधारपदाची आणि भारतीय संघाची खूप प्रशंसा केली होती. त्यांनी असे म्हटले होते की, ‘हा भारतीय संघ धमकी सहन करणार संघ राहिलेला नाही. पूर्वीच्या पिढ्या हे सहन करत होत्या.’

भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर त्यांच्या वक्तव्यावर जास्त खूश झाले नाहीत आणि त्यांनी उत्तर दिले, ‘विराट कोहलीच्या आधीची भारतीय पिढी ‘भित्री’ नव्हती. पण उत्कटतेने खेळायची. आक्रमकता तुमच्या चेहऱ्यावर असणे आवश्यक नाही. भारताने 1971 मध्ये 1-0 आणि 1986 मध्ये 2-0 च्या फरकाने इंग्लंडला इंग्लंडमध्ये नमवले होते आणि तेही अगदी चांगल्या इंग्लिश संघाविरुद्ध विजय मिळवला होता, हे कधीही विसरू नका.’

भारतीय संघ सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. विराटसेनेला तिसरी कसोटी जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 151 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

लाॅर्ड्सचे हिरो हेडिंग्लेवर ठरले ‘झिरो’..! भारताचे ‘हे’ दोघे खेळाडू भोपळाही न फोडता तंबूत माघारी

Video: ‘धूमधडाक्यासाठी तयार राहा’; हसरंगा अन् चमीराचा आरसीबीच्या चाहत्यांना खास संदेश

त्याला स्वत:च्या रंगात रंगलेले पाहून आनंद झाला, तो डोळ्यांत डोळे घालून खेळणारा गोलंदाज – विराट कोहली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---