टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांना प्रथमच हे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. २०१० टी२० विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात हरला होता. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ प्रथमच टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्याच्या निकाला बाबत अनेक अंदाज लावण्यात येत आहेत.
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी देखील या सामन्याबाबत आपला अंदाज व्यक्त करत ऑस्ट्रेलिया संघ बाजी मारणार असल्याचे म्हटले आहे.
दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी एक वाहिनीशी बोलताना शनिवारी (१३ नोव्हेंबर) सांगितले की, ऑस्ट्रेलियाचा आयसीसी बाद फेरीतील सामन्यांमध्ये जबरदस्त रेकॉर्ड आहे, त्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात त्यांच्यावर दडपण कमी असेल याचा त्यांना मानसिक फायदा होईल.
गावसकर म्हणतात, ‘जेव्हा तुम्ही हरण्यापेक्षा जास्त जिंकता, तेव्हा मैदानात उतरल्यावर कोणत्या प्रकारच्या गोष्टी घडणार आहेत हे तुम्हाला माहीत असते आणि तुम्ही त्या बदलण्यातही सक्षम होत असतात. मला वाटते की ऑस्ट्रेलियन संघ या क्षणी एका चांगल्या लयीत आहेत, त्यांना याचा फायदा होईल.’
ऑस्ट्रेलियन संघाचा केवळ न्यूझीलंडविरुद्धच नाही तर बाद फेरीतील इतर संघांविरुद्धही जबरदस्त विक्रम असल्याचे गावसकर यांनी सांगितले आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ सलग तिसऱ्यांदा आयसीसीच्या अंतिम फेरीत पोहोचला असून प्रथमच विश्वचषक जिंकण्याचा त्यांचा विचार आहे.
न्यूझीलंड संघाची अडचणीची बाब म्हणजे त्यांचा विश्वासू यष्टीरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे अंतिम सामन्यापूर्वीच संघाबाहेर झाला आहे. आता टीम सिफर्टला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळणार आहे.
सुनील गावसकर म्हणतात की, ‘जर कॉनवे तंदुरुस्त असता, तर मी म्हटले असते की, दोन्ही संघांच्या जिंकण्याच्या विजयाच्या ५०-५० टक्के शक्यता आहेत, पण कॉनवे संघात नाही आणि एक नवीन खेळाडू आला आहे. ज्याने अजून एकही सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत न्यूझीलंडसाठी हा सामना अजिबात सोपे जाणार नाही. आणि मी आधीच सांगितले आहे की ऑस्ट्रेलियाचा बाद फेरीतील रेकॉर्ड खूप चांगला आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
जाफर रॉक्स! विलियम्सन-विराटवर केले गमतीदार ट्विट; चाहते झाले लोटपोट
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड भिडणार, जाणून घ्या काय आहे हवामान अंदाज
न्यूझीलंडला ‘अंडरडॉग’ म्हटल्यावर आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणाला…