भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या प्रतिष्ठेच्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 ला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतीय संघ विजय मिळवून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो. या मालिकेत भारतीय संघाचे मदार प्रामुख्याने फिरकी गोलंदाजांवर असेल. मात्र, संघात कोणाला संधी द्यायची याबाबत आता भारताचे माजी फिरकीपटू व माजी निवडसमिती सदस्य सुनील जोशी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
सुनील जोशी हे नुकतेच एका क्रिकेट संकेतस्थळाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाची रणनीती काय असेल? याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले,
“मला वाटते की या मालिकेत कुलदीप यादव याला संधी मिळायला हवी. रविचंद्रन अश्विन भारताचा प्रथम क्रमांकचा फिरकीपटू म्हणून मालिकेत सहभागी होईल. मात्र, त्यानंतर रविंद्र जडेजा उपलब्ध नसेल तर अक्षर पटेलसह कुलदीप यादव याला देखील संघात संधी मिळायला हवी. मी त्याला अत्यंत जवळून गोलंदाजी करताना पाहिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो नक्कीच यशस्वी ठरेल. कारण, त्याचे चेंडू फलंदाजांना अडचणीत टाकून झेल द्यायला मजबूर करतात.”
कुलदीप याने मोठ्या काळानंतर ऑगस्ट महिन्यात भारतीय संघासाठी पुनरागमन केले होते. तेव्हापासून तो सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. त्यामुळे कसोटी संघातही त्याचा फायदा होईल, असे अनेक दिग्गजांना वाटते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव.
(Sunil Joshi Said Kuldeep Yadav Will Be Key For Border Gavaskar Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“युवा खेळाडूंनी धोनीकडून शिकावे”, माजी प्रशिक्षकाने दिला मोलाचा सल्ला
IND vs AUS | पहिल्या कसोटीत पदार्पण करू शकतो ‘हा’ ऑसी वेगवान गोलंदाज, खेळपट्टीविषयी दिली खास प्रतिक्रिया