---Advertisement---

किंगच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, विस्फोटक खेळाडूची संघात एंट्री!

---Advertisement---

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स 31 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. आता या सामन्यापूर्वी केकेआरसाठी मोठी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडू सुनील नारायण तंदुरुस्त झाला आहे. या सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे शिवाय तो सरावातही परतला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात खेळला नव्हता.

जेव्हा सुनील नारायण कोलकाता नाईट रायडर्सकडून शेवटच्या सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या जागी मग मोईन अलीला संधी मिळाली. त्यानंतर मोईनने चार षटकांत 23 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय त्याने पाच धावाही केल्या. आता जर नारायण तंदुरुस्त असेल तर मोईनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते.

सुनील नारायणने आयपीएलमध्ये शतक झळकावले आहे. सुनील नारायण 2012 पासून आयपीएलचा भाग आहे. त्याने एकट्याने केकेआर संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तो खूप चांगली गोलंदाजी करतो आणि आक्रमक फलंदाजीतही तो कुशल खेळाडू आहे. त्याने 178 आयपीएल सामन्यांमध्ये 181 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 1587 धावा आहेत. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एक शतक आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत.

आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात आरसीबीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. यानंतर केकेआरने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना जिंकला. केकेआरने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, त्यापैकी एक जिंकला आहे आणि एक गमावला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---