---Advertisement---

रोहितला आयपीएलमध्ये सातव्यांदा बाद करून ‘या’ गोलंदाजाचा मोठा विक्रम; केली दिग्गजांशी बरोबरी

---Advertisement---

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी (२३ सप्टेंबर) रात्री मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात केकेआरने मुंबईवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. केकेआरचा फिरकी गोलंदाज सुनील नरेनने सामन्यात महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची महत्वाची विकेट घेतली. रोहित या सामन्यात ३४ धावा करून सुनील नरेनच्या फिरकी गोलंदाजीचा शिकार झाला. सुनीलने या सामन्यामध्ये त्याच्या चार षटकांत केवळ २० धावा दिल्या आणि रोहितचा महत्वाचा विकेटही घेतला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

नरेनने रोहितला आयपीएलमध्ये तब्बल सात वेळा केले आहे बाद
आयपीएलच्या इतिहासामध्ये एकाच फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करण्याच्या बाबतीत जहीर खान आणि संदीप शर्मानंतर आता सुनील नरेनचेही नाव सामील झाले आहे. सुनील नरेनने यापूर्वी कर्णधार रोहित शर्माला आयपीएलमध्ये सहा वेळा बाद केले होते, त्यानंतर या सामन्यात त्याने रोहितला सातव्यांदा बाद केले आहे. याआधी मुंबई इंडियन्सचा गोलंदाज झहीर खानने एम एस धोनीला आयपीएलमध्ये सात वेळा बाद केले आहे. तसेच संदीप शर्माने विराट कोहलीला सात वेळा बाद केले आहे. आता या यादीत सुनील नरेनचेही नाव जोडले गेले आहे.

नरेन गुरुवारी रोहित शर्माची विकेट घेतल्यानंतर आनंदी दिसला आणि त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला, “रोहित शर्माची विकेट मिळवणे नेहमीच चांगले असते, मग ते कोणत्याही फाॅर्मेटमध्ये मिळाली असो. रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी सर्वात महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याला बाद करणे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे.”

रोहित बाद झाल्यानंतर मुंबई इंडियन्सला लागली गळती
रोहित शर्मा आणि क्विंटन डी काॅक यांनी मुंबईच्या डावाची चांगली सुरुवात दिली. त्यावेळी मुंबई मोठी धावसंघ्या करेल अशी शक्यता होती. मात्र, रोहित बाद झाल्यानंतर मुंबईच्या संघाला गळती लागली. सलामीवीर जोडीने पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. रोहित ३३ धावा करून सुनील नरेनच्या चेंडूवर बाद झाला आणि त्यापाठोपाठ मुंबईचा संघ नियमित वेळेच्या अंतराने विकेट्स गमावत गेला. संघाला २० षटकात केवळ १५५ धावा करता आल्या.

केकेआरने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवलेला दिसला. संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये चांगले प्रदर्शन केले. लाॅकी फर्ग्यूसन आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्रिपाठीने ४२ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या. तसेच अय्यरने ३० चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने केवळ १५.१ षटकात १५९ धावा केल्या आणि सामना नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-आज रंगणार आयपीएल उत्तरार्धातील पहिले ‘डबल हेडर’; युवा राजस्थानसमोर अनुभवी दिल्लीचे आव्हान

-सीएसकेविरुद्धच्या एका अर्धशतकाने कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रमांची नोंद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---