पुणे। बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए 16वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत मुलांच्या गटात गुजरातच्या अक्षज सुब्रमणियम याने तर, मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या प्रिशा शिंदे यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश मिळवत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. तर, एकेरीत पुण्याच्या अवनीश चाफळे याने तर मुलींच्या गटात अग्निमित्रा भट्टाचार्य या खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात बिगरमानांकित अवनीश चाफळे याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या तेज ओकचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या मानांकित गुजरातच्या अक्षज सुब्रमणियमने सहाव्या मानांकित विवान कारंडे 6-4, 6-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत उपांत्य फेरीत गुजरातच्या आकांश सुब्रमणियमने अक्षज सुब्रमणियमच्या साथीत महाराष्ट्राच्या तेज ओक व अभिराम निलाखे या जोडीचा 6-4, 4-6, 10-6 असा पराभव केला.
मुलींच्या गटात तिसऱ्या मानांकित अग्निमित्रा भट्टाचार्य हिने श्रुती नानंजकरचा 6-2, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. चौथ्या मानांकित प्रिशा शिंदेने सहाव्या मानांकित मेहक कपूरचे आव्हान 6-0, 6-0 असे सहज संपुष्टात आणले. दुहेरीत प्रिशा शिंदे व मेहक कपूर यांनी प्रतिष्ठा सैनी व रजिथा राजेश यांचा 6-1, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य फेरी): मुले:
अवनीश चाफळे(महा)वि.वि.तेज ओक(महा) 6-4, 6-4;
अक्षज सुब्रमणियम(गुजरात)[2]वि.वि.विवान कारंडे(महा)[6]6-4, 6-0;
मुली:
प्रिशा शिंदे(महा)[4] वि.वि.मेहक कपूर(महा)[6] 6-0, 6-0;
अग्निमित्रा भट्टाचार्य(महा)[3] वि.वि.श्रुती नानंजकर(महा) 6-2, 6-1;
दुहेरी गट: मुले: उपांत्य फेरी:
अर्चित धूत/अर्जुन किर्तने वि.वि.अमोघ दामले/देव तुराकिया 6-2, 6-1;
आकांश सुब्रमणियम/अक्षज सुब्रमणियम वि.वि.तेज ओक/अभिराम निलाखे 6-4, 4-6, 10-6;
मुली:
प्रिशा शिंदे/मेहक कपूर वि.वि.प्रतिष्ठा सैनी/रजिथा राजेश 6-1, 6-1;
सिया प्रसादे/देवांशी प्रभुदेसाई वि.वि.श्रुती नानंजकर/मृण्मयी जोशी 6-3, 6-2.
महत्त्वाच्या बातम्या –
माही मार रहा है! आयपीएलमध्ये ‘असा’ पराक्रम तीन वेळा करणारा धोनी एकमेवच








