आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (4 मे) सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना खेळला गेला. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून केकेआरच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरवत केकेआरच्या फलंदाजांनी सन्मानजनक अशा 7 बाद 171 धावा केल्या. यादरम्यान केकेआरचा कर्णधार नितिश राणा याला बाद करताना सनरायझर्सचा कर्णधार ऐडन मार्करम याने एक शानदार झेल टिपला.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1654142320432803843?t=p32unoSHxwoBp4dvCqiB2Q&s=19
प्रथम फलंदाजी करताना केकेआरची सुरुवात खराब झाली होती. रहमानुल्लाह गुरबाज, जेसन रॉय व व्यंकटेश अय्यर हे केवळ 35 धावा धावफलकावर असताना तंबूत परतले. त्यानंतर रिंकू सिंग व कर्णधार नितिश राणा यांनी डाव पुढे नेला. दोघांनी चौथ्या गड्यासाठी 60 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी संपवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार ऐडन मार्करम याने स्वतःच्याच गोलंदाजीवर एक अप्रतिम झेल पूर्ण केला.
मार्करम बारावे षटक टाकत असताना दुसऱ्या चेंडूवर राणाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. हवेत उंच गेलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जात असताना मार्करमने स्वतः जवळपास 35 यार्डचे अंतर पूर्ण करत झेप मारून लाजवाब झेल टिपला. अनेकांनी हा या हंगामातील सर्वोत्तम झेल असल्याचे देखील म्हटले.
केकेआरच्या डावाबद्दल बोलायचे झाल्यास, खराब सुरुवातीनंतर रिंकू सिंग व कर्णधार नितिश राणा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला सामन्यात आणले. त्यानंतर आंद्रे रसेल एक आक्रमक खेळी करून बाद झाला. टी नटराजन व भुवनेश्वर कुमार यांनी अखेरच्या षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत केकेआरला 171 पर्यंत मर्यादित ठेवले.
(Sunrisers Hyderabad Captain Aiden Markram Complete Stunning Catch Of Nitish Rana)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केदारने सांगितली आयपीएल कमबॅकची कहाणी! म्हणाला, “मी कॉमेंट्री करत होतो आणि…”
चौथ्या विजयासाठी केकेआर-सनरायझर्सची झुंज! घरच्या मैदानावर हैदराबादची प्रथम गोलंदाजी






