लवकरच इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा रणसंग्राम सुरू होणार आहे. यंदाचा आयपीएल चषक आपल्या नावावर करण्याच्या उद्देश्याने सर्व फ्रँचायझी तयारीला लागले आहेत. भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूंनीही आपापल्या फ्रँचायझीत सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. ऑरेंज आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर हादेखील भारतात पोहोचला आहे.
मात्र आपल्या कुटुंबीयांना सोडून भारतासाठी उड्डाण भरताना वॉर्नरची मुली भावुक झालेल्या दिसल्या. यावर हैदराबाद फ्रँचायझीने अतिशय भन्नाट प्रतिक्रिया देत सर्वांची मने जिंकली आहेत.
एप्रिल १, रोजी वॉर्नर भारतात येण्यासाठी रवाना झाला होता. बीसीसीआयने आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आपल्या कुंटुंबीयांसह येण्याची मुभा दिली आहे. मात्र वॉर्नर आपल्या कुटुंबीयांविना ऑस्ट्रेलियावरुन भारतात आला. त्यामुळे आपल्या लाडक्या वडिलांना आपल्याला सोडून जाऊ न देण्यासाठी त्याच्या मुली भाबडा प्रयत्न करु लागल्या.
वॉर्नरची मुलगी इंडी आणि आयवी त्याच्या गळ्याला पडून रडू लागल्या. यावेळी वॉर्नरही भावुक झाल्याचे दिसले. वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नरने ट्विटरवर या भावनिक क्षणाचे फोटो शेअर केले आहेत.
Bye daddy we love you. @SunRisers get ready, @davidwarner31 is incoming! #IPL2021 #OrangeArmy 🧡🖤 pic.twitter.com/ylRelHmlms
— Candice Warner (@CandiceWarner31) April 1, 2021
या फोटोंवर प्रतिक्रिया देताना हैदाराबाद संघाने लिहिले आहे की, ‘लवकरच भेटूया कर्णधार. आम्ही तुमच्या बाबाची काळजी घेऊ इंडी आणि आयवी’. हैदराबाद संघाची ही प्रतिक्रिया चाहत्यांना खूपच भावली आहे. अनेकांनी या प्रतिक्रियेला पसंती दर्शवली आहे.
See you soon, captain 🧡
We'll take good care of him, @CandiceWarner31 ☺️ https://t.co/zNLHhDIB49
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 1, 2021
यावर्षी हैदराबादचा पहिला सामना ११ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चेन्नईत होणार आहे. या हंगामात हैदराबादच्या साखळी फेरीतील १४ सामन्यांपैकी ११ सामने रात्री ७.३० वाजता सुरु होतील. तर ३ सामने दुपारी ३.३० वाजता सुरु होतील.
🚨 Attention #OrangeArmy 🚨
Here’s a post you must save!!
Our fixtures for #IPL2021 are out! pic.twitter.com/WsQmLL7Qdy
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 7, 2021
असे आहे आयपीएल 2020मधील सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक –
११ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१४ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
१७ एप्रिल – चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ एप्रिल – चेन्नई, पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वाजता
२५ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२८ एप्रिल – दिल्ली, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
२ मे – दिल्ली, राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३०
४ मे – दिल्ली, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
७ मे – दिल्ली, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
१३ मे – कोलकाता, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१७ मे – कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
१९ मे – बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे – बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वाजता
सनरायझर्स हैदराबाद – २५ खेळाडू (८ परदेशी)
डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, मनिष पांडे, वृद्धिमान साहा, अभिषेक शर्मा, बेसिल थँपी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर ,अब्दुल समद, मिशेल मार्श, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विराट सिंग, केदार जाधव, मुजीब झारदान, जे सुचिथ
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला विश्वचषक सेमी फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या नेहराला फायनलमध्ये का दिली नाही संधी? वाचा कारण
आयपीएल २०२१ मधील राखीव खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन पाहिलीत का? सगळेच आहेत शेरास सव्वाशेर
Video: तू स्टंपवर का चेंडू टाकतोय, आधीच विरोधक बॅकफूटवर आहेत; होल्डरची भर सामन्यात स्लेजिंग