---Advertisement---

CSK vs SRH: हैदराबादने जिंकला टाॅस, चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण! पहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

On: शुक्रवार, एप्रिल 25, 2025 7:08 PM
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 43वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज (SRH vs CSK) संघात खेळला जाणार आहे. दरम्यान पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबाद आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ मैदानात उतरताना दिसेल. दरम्यान दोन्ही संघ चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर आमने-सामने असतील.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-

सनरायझर्स हैदराबाद- अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, कामिंदू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज- शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम करन, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), दीपक हुडा, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना

हैदराबादच्या संघाबद्दल बोलायचे झाल्यास, संघाने या हंगामात 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात विजय मिळवण्यात हैदराबादचा संघ यशस्वी राहिला. संघाने 6 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. हैदराबादच्या संघात अनेक उत्कृष्ट फलंदाज असून देखील संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. दरम्यान हैदराबादचा संघ गुणतालिकेत 9व्या स्थानी आहे.

दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी यंदाच्या हंगामात खूपच निराशाजनक राहिली आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 8 सामन्यात केवळ 2 विजय मिळवले आहेत. सध्या चेन्नईचा संघ गुणतालिकेत 10व्या स्थानी आहे. दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये उर्वरित सर्व सामने जिंकून इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---