---Advertisement---

टॉस जिंकून हैदराबादचा बॉलिंगचा निर्णय, मुंबई करणार फलंदाजी; विजयाची हॅट्रिक कुणाच्या पारड्यात?

Rohit-Sharma-And-Aiden-Markram
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 25वा सामना मंगळवारी (दि. 18 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर या सामन्याला 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक हैदराबाद संघाने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विजय मिळवत मुंबई संघ विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करेल.

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने या सामन्यात एकही बदल केला नाहीये. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात एक बदल झाला आहे. डुआन जान्सेन बाहेर पडला असून त्याच्या जागी जेसन बेहरेनडॉर्फ याची एन्ट्री झाली आहे.

या स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद एकाच नावेत आहेत. दोन्ही संघांनी त्यांचे शेवटचे दोन्ही सामने दिमाखात जिंकले आहेत. मुंबई संघ 4 पैकी 2 सामने जिंकत 4 गुणांसह आठव्या स्थानी आहे, तर हैदराबाद संघही 4 पैकी 2 सामने जिंकत नवव्या स्थानी आहे. आता या सामन्यात कोणता संघ विजयाची हॅट्रिक करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Sunrisers Hyderabad have won the toss and have opted to field against mumbai indians)

उभय संघाची प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबाद
मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को यान्सेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन

मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेविड, कॅमरून ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहाल वढेरा, ऋतिक शोकिन, पीयुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेवणासाठी तिलक वर्माच्या घरी पोहोचला मुंबईचा आख्खा संघ! स्वतः सचिननही होता उपस्थित
हृदय पिळवटून टाकणारी बातमी! क्रिकेट खेळताना युवकावर गोळीबार, पूर्ववैमनस्यातून हत्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---