सनरायझर्स हैदराबाद संघाने बुधवारी (27 मार्च) अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील ही एखाद्या संघाने केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी वेगवान सुरुवात मिळवून दिली. तर शेवटच्या षटकांमध्ये हेनरिक क्लासेन आणि ऍडेन मार्करम चौकार आणि षटकारांनी संघाची धावसंख्या उंचावली. 20 षटकांमध्ये हैदराबादने 3 विकेट्सच्या नुकसानावर 277 धावांपर्यंत मजल मारली.
आयपीएल इतिहासात 270 धावांपर्यंत पोहोचणारा सनरायझर्स हैदराबाद पहिलाच संघ बनला आहे. याआधी आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या नावावर होती. आरसीबीने 2013 साली पुणे वॉरिअर्स संघाविरुद्ध 263 धावा केल्या होत्या. बुधवारी (27 मार्च) सनरायझर्स हैदराबादने सर्व विक्रम मोडत यादीत पहिला क्रमांक पटकावला.
हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण हा निर्णय हैदराबादच्या फलंदाजांनी चुकिचा ठरवला. सलामीवीर मयंक अगरवाल 13 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. पण त्याच्या साथीने आलेला ट्रेविस हेड धमाकेदार खेळी करण्याचा विचार करूनच खेळपट्टीवर उतरला होता. हेटला साथ मिळाली ती तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अभिषेक शर्मा याची. हेटने 24 चेंडूत 62, तर अभिषेकने 23 चेंडूत 63 धावा केल्या. अभिषेकने अवघ्या 16, तर हेडने 18 चेंडूत स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले.
हेडच्या रुपात हैदबाराने आठव्या षटकात दुसरी विकेट गमावली आणि ऍडेन मार्करम फलंदाजीला आला. डावातील 11व्या षटकात अभिषेकनेही विकेट गमावली. त्यानंतर ऍडेन मार्कर याने 28 चेंडूत 42, तर हेनरिक क्लासेन याने 34 चेंडूत 80 धावांची खेळी केली. क्लासेनने या धावा 235.29च्या स्ट्राईक रेटने, तर मार्करमने 150.00च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याआधी ट्रेविस हेड याने 258.33, तर अभिषेक शर्मा याने 273.91 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
11 YEAR OLD RECORD HAS SHATTERED…!!!
– The most painful day for a RCB fan. 💔 pic.twitter.com/d0DYJLLkbi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 27, 2024
Highest Team Score in IPL
SRH – 277/3 v MI*
RCB – 263/5 v PWI
LSG – 257/5 v PBKS
RCB – 248/3 v GL
CSK – 246/5 v RR#MIvsSRH— Broken Cricket (@BrokenCricket) March 27, 2024
मुंबई इंडियन्ससाठी 17 वर्षीय क्वेना मफाका याने 4 षटकात सर्वाधिक 66 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. हार्दिक पंड्या, जेराल्ड कोएत्झी आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. जसप्रीत बुमराह आणि शम्स मुलानी यांनी अनुिक्रमे 36 आणि 33 धावा खर्च केल्या पण एकही विकेट घेऊ शकले नाहीत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
सनरायझर्स हैदराबादः मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
प्रभावशाली खेळाडू: नितीश कुमार रेड्डी, ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव
मुंबई इंडियन्स : ईशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.
प्रभावशाली खेळाडू: डेवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, नेहल वढेरा, विष्णू विनोद
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 । मुंबई-हैदराबाद पहिल्या विजयासाठी आमने-सामने, हार्दिकने टॉस जिंकताच प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल
एकाच सामन्यात दोन वेळा मोडला मोठा विक्रम! हैदराबादसाठी अभिषेकने ठोकलं आतापर्यंतचं सर्वोत्तम अर्धशतक