रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आयपीएल २०२२च्या ३६व्या सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. शनिवारी (दि. २३ एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअम येथे पार पडलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने बेंगलोरची विजयाची हॅट्रिक होण्यापासून रोखले. त्यांनी बेंगलोरला ९ विकेट्सने धूळ चारली. या विजयाचे शिल्पकार अभिषेक शर्मा आणि मार्को जेन्सेन ठरले. जेन्सेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाची सुरुवात वाईट झाली. त्यांनी सुरुवातीला पहिल्याच षटकात आपल्या ३ मोठ्या खेळाडूंना गमावले. त्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजी करताना १६.१ षटकात सर्वबाद होत फक्त ६८ धावा करता आल्या. हैदराबादने हे आव्हान सहजरीत्या ८ षटकात १ विकेट गमावत पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.
An emphatic win for #SRH as they beat #RCB by 9 wickets 👏🔥
Splendid performance from Kane & Co. This is one happy group right now 😃😃
They move to No.2 on the points table #TATAIPL | #RCBvSRH | #IPL2022 pic.twitter.com/TocgmvruFL
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
हैदराबादकडून अभिषेक शर्माची शानदार फटकेबाजी
हैदराबादकडून फलंदाजी करताना अभिषेक शर्माने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने २८ चेंडूंचा सामना करताना ४७ धावा केल्या. यामध्ये १ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार केन विलियम्सन आणि राहुल त्रिपाठीने नाबाद राहत अनुक्रमे नाबाद १६ आणि ७ धावा करत सामना आपल्या संघाला जिंकून दिला. बेंगलोरकडून गोलंदाजी करताना हर्षल पटेलला अभिषेक शर्माची विकेट घेण्यात यश आले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
बेंगलोर संघाचा डाव पुरता ढासळला
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून सुयश प्रभूदेसाईलाच सर्वाधिक १५ धावा करता आल्या. तसेच, ग्लेन मॅक्सवेलला १२ धावांवर समाधान मानावे लागले. सुरुवातीला पहिल्याच षटकात बेंगलोर संघाने आपल्या महत्त्वाच्या ३ खेळाडूंची विकेट गमावली होती. त्यात कर्णधार फाफ डू प्लेसिस (५ धावा), अनुज रावत (० धावा), आणि विराट कोहली (० धावा) यांचा समावेश होता. यांच्याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला देखील भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे बेंगलोर संघाचा डाव पुरता ढासळला.
यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना मार्को जेन्सेन आणि टी नटराजन यांनी सर्वोत्तम योगदान दिले. जेन्सेनने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. या तिन्ही विकेट्स त्याने पहिल्याच षटकात घेतल्या आणि त्याही डू प्लेसिस, रावत आणि कोहलीची. याव्यतिरिक्त नटराजनने ३ षटके गोलंदाजी करताना १० धावा देत ३ विकेट्सची नोंद आपल्या नावावर केली. तसेच, जगदीश सुचिथने २, तर भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी १ विकेटवर आपले नाव कोरले.
या विजयासह हैदराबाद संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले आहे. तसेच, बेंगलोर संघाला चौथ्या स्थानी घसरावे लागले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ‘या’ ठिकाणी खेळला जाणार आयपीएल २०२२चा अंतिम सामना; दर्शकांना १०० टक्के क्षमतेने एन्ट्री
KKR vs GT। फर्ग्युसनच्या अफलातून कॅचने फिरवला सामना; रसेलच्या विकेटमुळे चाहत्यांच्या अपेक्षा धुळीस