---Advertisement---

वॉर्नरने सोडले मौन, सनरायझर्सने कॅप्टन्सीवरुन काढण्यामागचे कारण न सांगितल्याचा खळबळजनक खुलासा

David Warner, Trevor Bayliss, Ricky Ponting
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वार्नरसाठी आयपीएलचा १४ वा हंगाम खूपच खराब राहिला आहे. वार्नर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. पण आयपीएलच्या या हंगामात त्याला चांगले प्रदर्शन करता आले नाही आणि त्याला त्याची आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरुनही काढून टाकण्यात आले. तसेच त्याला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील काही सामन्यांमध्ये संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी दिली गेली नाही.

यामुळे वार्नर नाराज झाला आहे आणि हैदराबाद संघाला रामराम ठोकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, वार्नरने स्वत: आता याबाबत खुलासा केला आहे.

स्पोर्ट्स टुडेसोबत वार्नर बोलत होता. तो यावेळी म्हटला की, “आत्ताच तुम्हाला संकेत मिळतो आहे की, तुम्हाला फ्रँचायझीद्वारे रिटेन केले जाणार नाही. मला पुढच्या वर्षी हैदराबादचा भाग बनायला आवडेल. हैदराबाद माझे दुसरे घर आहे.”

याव्यतिरिक्त वार्नरने असेही सांगितले की, “मला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. मला पुढच्या वर्षी त्यांच्यासाठी खेळायचे आहे, पण हे फ्रँचायझी आणि व्यवस्थापनावर निर्भर आहे. पुढच्या वर्षी मेगा लिलावही होणार आहे. मला माहित नाही मला कर्णधारपदावरून का हटवले गेले. पण तुम्हाला पुढे जायचे असते.”

डेविड वॉर्नरच्या या हंगामातील प्रदर्शनाचा विचार केला तर त्याला ८ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी दिली गेली. त्याने या सामन्यांमध्ये २४ च्या सरासरीने आणि १०८ च्या स्ट्राइक रेटने १९५ धावा केल्या आहेत. २००९ नंतर पहिल्यांदाज वॉर्नरची धावसंख्या २०० धावांपेक्षा कमी झाली आहे. २०१४ ते २०२० या दरम्यान त्याने सलग सहा हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. आयपीएलच्या मागच्या हंगामात त्याने १६ सामन्यांमध्ये ५४८ धावा केल्या होत्या. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे.

डेविड वार्नरने आतापर्यंत आयपीएलमध्ये १५० सामने खेळले आहेत आणि यामध्ये ४२ च्या सरासरीने ५४४९ धावा केल्या आहेत. वार्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा विदेशी खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

DCच्या ‘या’ गोलंदाजाची लॉटरी, आयपीएलमधील प्रदर्शनामुळे भारताच्या टी२० विश्वचषक संघात लागणार वर्णी!

कर्णधार म्हणून अंतिम सामन्यात कोहलीच्या हाती निराशा; ‘तुझा अभिमान आहे’, म्हणत बहिणीने वाढवलं मनोबल

‘या’ क्रिकेटरची बड्डेदिनी स्वत:लाच ग्रेटभेट, शतक ठोकत मोडला मितालीचा २२ वर्षे जुना विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---