आयपीएल २०२१ च्या ३७ व्या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी केन विल्यमसनच्या सनरायझर्स हैदराबादसमोर जवळजवळ गुडघे टेकले. पंजाबचा संघ निर्धारित २० षटकात फक्त १२५ धावा करू शकला. सामन्यादरम्यान, हैदराबाद संघाकडून पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून आलेल्या जगदीश सुचितने हवेत सूर मारला आणि त्याने एका हाताने अद्भुत झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांना चांगलाच आवडत आहे.
जेसन होल्डरने टाकलेल्या १६ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर फलंदाज दीपक हुड्डाने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण जगदीश सुचितने त्याचा डाव हाणून पाडला. जगदीश सुचित त्याच्या जागेवरून थोडा बाहेर आला आणि हवेत सूर मारून एका हाताने झेल घेतला.
जगदीश सुचितने झेल पकडताच त्याचा सहकारी क्षेत्ररक्षक मनीष पांडेने त्याला मिठी मारली. तर इतर खेळाडूंनाही जगदीश सुचितची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखता आले नाही. दीपक हुड्डाने बाद होण्यापूर्वी १० चेंडूच्या मदतीने १३ धावा केल्या.
https://twitter.com/SteveComrade_/status/1441786199589277703?s=20
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून फक्त १२५ धावा केल्या. सलामीवीर मयांक अग्रवाल फक्त ५ धावा करून बाद झाला. तर लोकेश राहुल २१ धावा करून बाद झाला. दोन्ही सलामीवीरांना जेसन होल्डरने बाद केले. त्यानंतर वेगवान खेळीसाठी ओळखला जाणाऱ्या ख्रिस गेलने १७ चेंडूत फक्त १४ धावा केल्या. त्याला राशीद खानने चालते केले. एडन मार्करम ३२ चेंडूत २७ धावा केल्या.
निकोलस पुरणने ८ धावा केल्या. त्याच्या खेळीत त्याने एक षटकार लगावला. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी काही आक्रमक फटके मारण्याचा प्रयत्न केले. दीपक हु़ड्डाने १३ धावा केल्या तर नॅथन ऍलिस १२ चेंडूत १२ धावा केल्या. हरप्रीत ब्रारने १८ धावा आणि शमी शून्य धावावर नाबाद राहिले. हैदराबादसाठी जेसन होल्डर सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्याने ४ षटकांत १९ धावा देऊन ३ बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थानच्या जखमेवर मीठ! दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर संजूला २४ लाखांचा दंड, बंदीचीही टांगती तलवार
दुर्देवचं म्हणावे, नाही का? त्यागीच्या चेंडूवर धवनने स्वत:च घेतली स्वत:ची विकेट, बघा नेमकं काय झालं