fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराटच्या आरसीबीला पराभवाची धूळ चारण्यासाठी हैद्राबादचा वॉर्नर उतरेल ‘या’ ११ शिलेदारांसह

Sunrisers Hydrabad Playing XI Of Their First IPL Match Of This Season

September 8, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संघामध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स बरोबरच सनरायझर्स हैद्राबादचेही नाव घेतले जाते. आयपीएलमध्ये हैद्राबादचा संघ २०१३ पासून खेळत आहे.

त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या ७ मोसमांपैकी ५ वेळा पहिल्या ४ संघांमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच २०१६ला त्यांनी विजेतेपदही जिंकले आहे. तर २०१८ला हैद्राबाद संघ उपविजेता ठरला होता. आता यावर्षी त्यांचा आयपीएलचे दुसरे विजेतेपद जिंकण्याचा इरादा असेल. यासाठी संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर नक्कीच प्रयत्न करताना दिसेल.

नुकतेच बीसीसीआयने आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सनराइजर्स हैद्राबादचा पहिला आयपीएल सामना हा विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध होणार आहे. अशात, बेंगलोरला पहिल्याच सामन्यात पराभूत करत आयपीएलची दमदार सुरुवात करण्यासाठी वॉर्नर कोणत्या ११ खेळाडूंना घेऊन मैदानावर उतरेल, याची सर्वांनाची उत्सुकता लागली असेल.

या लेखात, आम्ही सनराइजर्स हैद्राबाद संघातील अंतिम ११ खेळाडूंचा आढावा घेतला आहे, जे त्यांच्या पहिल्या आयपीएल सामन्यात खेळताना दिसू शकतात.

असा असेल सनराइजर्स हैद्राबादचा संभावित प्लेइंग इलेव्हन संघ (Sunrisers Hydrabad Playing XI Of Their First IPL Match Of This Season)-

१. डेव्हिड वॉर्नर (कर्णधार)

आयपीएल २०२०मध्ये सनराइजर्स हैद्राबाद संघाची धुरा डेव्हिड वॉर्नर सांभाळताना दिसेल. २०१६साली वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालीच हैद्राबाद आयपीएल विजेता ठरला होता. त्यामुळे कर्णधार वॉर्नर हा हैद्राबादच्या पहिल्याच नव्हे तर सर्व आयपीएल सामन्यात संघाचा भाग असेल.

वॉर्नर हा एक दमदार सलामीवीर फलंदाज आहे, त्यामुळे तो संघाला दमदार सुरुवात करुन देण्याचीही जबाबदारी सांभाळताना दिसेल. वॉर्नरची आतापर्यंतची आयपीएल कारकिर्द शानदार राहिली आहे. तो आयपीएलच्या इतिहासात एकदाही शून्यावर बाद न होता, ३ वेळा ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) मिळवणारा एकमेव फलंदाज आहे.

२. जॉनी बेयरस्टो

आयपीएल २०१९मध्ये जॉनी बेयरस्टो आणि डेव्हिड वॉर्नरच्या सलामीवीर फलंदाजी जोडीने कमालीचे प्रदर्शन केले होते. त्यांच्या या प्रदर्शानमुळेच हैद्राबाद संघ प्ले ऑफपर्यंत पोहोचू शकला होता. त्यामुळे नक्कीच हे दोन्ही सलामीवीर फलंदाज यंदाही एकमोकांसोबत संघाच्या सलामीची जबाबदारी सांभाळू शकतात.

३. मनिष पांडे

भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज मनिष पांडे हा हैद्राबादच्या पहिल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. कारण, गतवर्षीच्या आयपीएल हंगामात पांडेने तिसऱ्या क्रमांकावर शानदार फलंदाजी प्रदर्शन केले होते. त्याने पूर्ण हंगामात १२ सामने खेळत ४३.००च्या सरासरीने ३४४ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा आणि नाबाद ८३ धावांचा समावेश होता.

४. विजय शंकर

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर आयपीएल २०२०मधील सनराइजर्स हैद्राबाद संघाच्या पहिल्या सामन्यात अंतिम ११ खेळाडूंचा भाग असेल. कारण, फलंदाजीसह शंकरची वेगवान गोलंदाजीमध्येही चांगली पकड आहे. त्यामुळे तो मधल्या फळीत फलंदाजी करण्यासह वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय म्हणून उपलब्ध राहू शकतो. सोबतच त्याच्या गतवर्षीच्या आकडेवारींमुळे नक्कीच वॉर्नर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देईल. शंकरने गतवर्षी १५ सामन्यात २४४ धावांची आणि १ विकेटची कामगिरी केली होती.

५. विराट सिंग

आयपीएल २०२०च्या लिलावात सनराइजर्स हैद्राबादने युवा फलंदाज विराट सिंगला १ कोटी ९० लाख रुपयांच्या किंमतीला विकत घेतले होते. त्यामुळे नक्कीच तो आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. कारण, संघाकडे मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी जास्त पर्याय उपलब्ध नाहीत. आणि विराटने देशांतर्गत स्तरावरील टी२० क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजी आकडेवारी उल्लेखनीय राहिली आहे.

६. अभिषेक शर्मा

कर्णधार डेव्हिड वॉर्नर डावखुरा युवा फिरकीपटू गोलंदाज अभिषेक वर्मालाही पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो. गतवर्षीच्या आयपीएल लिलिवात हैद्राबादने त्याला दिल्ली कॅपिटल्स संघातून ट्रेड करत आपल्या संघात सामील केले होते. पण त्याला जास्त सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही. त्याने गतवर्षी केवळ ३ सामने खेळत १ विकेट चटकावली आणि ९ धावा केल्या.

मात्र, हाच खेळाडू यंदा आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करु शकतो. सोबतच युएईतील मैदाने फिरकीपटूंसाठी सोईस्कर असल्यामुळे त्याला बराच फायदा होईल.

७. मोहम्मद नबी

अफघानिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी हा वॉर्नरच्या सनराइजर्स हैद्राबाद संघाचा भाग असेल. तो फिरकी गोलंदाजी करण्यासोबत खालच्या फळीत फलंदाजीची महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. तो एक दमदार विस्फोटक फलंदाज आहे. गतवर्षी त्याला हैद्राबादकडून केवळ ८ सामने खेळायला मिळाले, तरीही नबीने ११५ धावांची उल्लेखनीय कामगिरी केली होती. सोबतच त्याने ८ विकेट्सही घेतल्या होत्या.

८. राशिद खान

सनराइजर्स हैद्राबाद संघाचा फिरकीपटू राशिद खान हा आयपीएल २०२०च्या पहिल्या सामन्याचाच नव्हे तर हंगामातील सर्व सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. तो एक दमदार फिरकीपटू आहे आणि युएईतील मैदाने फिरकीपटूंसाठी लकी आहेत. त्यामुळे तो यंदा खतरनाक गोलंदाजी प्रदर्शन करताना दिसेल. गोलंदाजीसह तो खालच्या फळीत फलंदाजीतही विस्फोटक भूमिका निभावू शकतो.

९. खलील अहमद

गतवर्षी सनराइजर्स हैद्राबादकडून ९ सामने खेळत १९ विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणजे, खलील अहमद. त्याच्या या दमदार आकडेवारीला पाहता कर्णधार वॉर्नर त्याला आयपीएल २०२०च्या पहिल्याच नव्हे तर हंगामातील सर्व सामन्यात संधी देऊ शकतो.

१०. भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार हा सनराइजर्स हैद्राबाद संघाचा प्रमुख आणि अनुभवी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे तोदेखील नक्कीच आयपीएल २०२०च्या सर्व सामन्यात हैद्राबाद संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. तो खलील अहमद आणि संदीप शर्मा या वेगवान गोलंदाजांचे नेतृत्त्व करताना दिसेल. गतवर्षीची त्याची कामगिरीदेखील चांगली राहिली होती. भुवनेश्वरने गतवर्षी १५ सामन्यात ७.८१च्या इकोनॉमी रेटने १३ विकेट्स चटकावल्या होत्या.

११. संदीप शर्मा

आयपीएल २०१८पासून वेगवान गोलंदाज संदीप शर्मा हा सनराइजर्स हैद्राबाद संघाचे प्रतिनिधित्त्व करत आहे. गतवर्षी या गोलंदाजाने ११ सामन्यात १२ विकेट्सची कामगिरी केली होती. त्यामुळे यावर्षीही कर्णधार वॉर्नर त्याला हैद्राबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देईल.


Previous Post

लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर्स म्हणु शकतात ‘मी पुन्हा येईन’!

Next Post

६ वर्षांनी आयपीएलमध्ये कमबॅक करणारा क्रिकेटर म्हणतोय, मी आता जास्तच हुशार झालोय

Related Posts

Photo Courtesy:
Twitter/ICC
क्रिकेट

मोहम्मद हाफिजचा मोठा विक्रम! रोहित, गप्टिल यांचा समावेश असलेल्या ‘या’ खास यादीत झाला समावेश

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

६ वर्षांनी आयपीएलमध्ये कमबॅक करणारा क्रिकेटर म्हणतोय, मी आता जास्तच हुशार झालोय

चुकिला माफी नाही, विराटच्या आरसीबीच्या एका चुकिला राजस्थानने केले नाही माफ

तो ठरणार बीग बॅश लीगमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय क्रिकेटर!

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.