सुपर कप २०१८च्या पात्रता फेरीसाठी एक दिवस बाकी असताना अाज AIFFने मुख्य फेरीची घोषणा केली आहे.
ही स्पर्धा आयएसएल आणि आय लीगमधील क्लबमध्ये खेळवली जाणार आहे. यात १६ संघ सहभागी होणार असून दोन्ही लीगमधील प्रत्येकी ६ संघाना (टा्ॅप ६) थेट संधी दिली जाणार आहे तर बाकी ४ संघ पात्रता फेरीतून पुढे वाटचाल करतील.
पात्रता फेरीचे सामने १५ मार्च पासून होणार आहेत. तर मुख्य फेरीला ३१ मार्चला सुरूवात होईल.
सुपर कप २०१८ची पहिली फेरी:
३१ मार्च: चेन्नई विरूद्ध ऐझव्ल
१ एप्रिल: बेंगलोर विरूद्ध पात्रता फेरीतून प्रवेश करणारा दुसरा संघ
१ एप्रिल: मोहन बगान विरूद्ध पात्रता फेरीतून प्रवेश करणारा पहिला संघ
२ एप्रिल: मिनरवा पंजाब विरूद्ध जमशेदपूर
३ एप्रिल: गोवा विरूद्ध पात्रता फेरीतून प्रवेश करणारा चौथा संघ
४ एप्रिल: पुणे विरूद्ध शिलाॅंग
५ एप्रिल: ईस्ट बेंगाल विरूद्ध पात्रता फेरीतून प्रवेश करणारा तिसरा संघ
६ एप्रिल: नेरोका विरूद्ध केरला ब्लास्टर्स
https://twitter.com/IndianFootball/status/973135302754627589