लाहोर | भारतातील प्रो-कबड्डी लीगच्या यशानंतर आता पाकिस्तानही कबड्डीची नवी लीग घेऊन येत आहे. या लीगला सुपर कबड्डी लीग असे नाव देण्यात आले आहे.
या लीगमध्ये ८ संघ सहभागी होणार असून त्या संघांना पाकिस्तानमधील शहरांची नावे देण्यात आली आहेत. त्यात लाहोर, कराची, इस्लामाबाद, पेशावर, फैसलाबाद, ग्वादर आणि मुलतान गुजरात संघाचा समावेश आहे.
२३ एप्रिलला लाहोर शहरात यासाठी लीलाव होणार असून त्यात १० देशातील खेळाडू भाग घेणार असल्याचे बोलले जात आहे.
Garma garam!
Super Kabaddi League's first song is finally here!
Song: Matti Mein Matti Ho Ja
Sway with the rhythm!#SuperKabaddi #DumHaiToSamneAa #Kabaddi #SuperKabaddiLeague #SKL #ComingSoon #Sports #InternationalSports #Pakistan #Lahore #Karachi #Islamabad pic.twitter.com/ckbs8uNiTg
— Super Kabaddi League (@Super_Kabaddi) April 15, 2018
ही स्पर्धा २ मे १० मे २०१८ या काळात होणार असून १ मेला स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार आहे.
या स्पर्धेत श्रीलंका, इराण, इराक, जपान, मलेशिया, केनिया आणि बांगलादेशचे खेळाडू भाग घेण्याची शक्यता आहे.
भारतात प्रो-कबड्डीचा सुरूवात २०१४ला झाली असून यात पाकिस्तानच्या खेळाडूंना भाग घेता येत नाही. प्रो-कबड्डी लीग ही भारतातील सर्वात यशस्वी लीगमध्ये आयपीएलनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारत आणि पाकिस्तानला जगात या खेळातील महासत्ता म्हणून ओळखले जाते.