---Advertisement---

आणि खऱ्या अर्थाने सुपर ओव्हरचा इतिहास उजेडात आला

On: बुधवार, जानेवारी 29, 2020 7:45 PM
---Advertisement---

हॅमिल्टन। आज(29 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना सेडन पार्क येथे पार पडला. भारताने या सामन्यात सुुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघ पहिल्यांदाच क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात सुपर ओव्हरमध्ये खेळत होता. यापुर्वी भारताचा पाकिस्तानविरुद्ध २००७ टी२० विश्वचषकात सामना टाय झाला होता परंतु त्या सामन्याचा निकाल बाॅल आऊटमध्ये लागला. तेव्हा क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर हा प्रकार नव्हता.

२००८मध्ये आयसीसीने बाॅल आऊटचा नियम बदलुन सुपर ओव्हरचा नवाकोरा नियम केला. आजपर्यंत अनेक टी२० सामने हे सुपर ओव्हर प्रकारात खेळवले गेले आहेत. अगदी २०१९ विश्वचषकाचा अंतिम सामनाही हाही सुपर ओव्हर प्रकारात खेळवला गेला होता.

न्यूझीलंड संघ सर्वाधिक वेळा सुपर ओव्हरचे सामने खेळला आहे. सुपर ओव्हरच्या ६ टी२० सामन्यापैकी ५ सामन्यात त्यांनी पराभव पाहिला आहे. तर एका सुपर ओव्हर वनडे सामन्यातही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सर्वाधिक सुपर ओव्हर खेळलेले संघ

७- न्यूझीलंड

३- इंग्लंड

२- ऑस्ट्रेलिया

२- कुवेत

२- पाकिस्तान

२- कतार

२- श्रीलंका

२- वेस्ट इंडिज

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---