---Advertisement---

टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील 3 रोमांचक सुपर ओव्हर्स! न्यूझीलंडचा दोनदा झालाय पराभव

---Advertisement---

टी20 विश्वचषकाला 2007 मध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. 2007 चा पहिला विश्वचषक खूपच रोमांचक झाला होता. भारतानं ती स्पर्धा जिंकली होती. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषकाचं आयोजन होत आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी नामिबिया आणि ओमान यांच्यात खेळला गेलेला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्याची ही केवळ तिसरी वेळ आहे.

2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही बरोबरीत सुटला होता, परंतु त्यावेळी सुपर ओव्हरची तरतूद नव्हती. तेव्हा सामन्याचा निकाल ‘बॉल आऊट’नं ठरवण्यात आला होता. 2012 च्या टी20 विश्वचषकात पहिल्यांदाच सुपर ओव्हर झाला. त्या स्पर्धेत दोनदा सुपर ओव्हर झाला होता. त्यानंतर आता तब्बल 12 वर्षांनंतर 2024 मध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळाला आहे.

टी20 विश्वचषकातील 3 सुपर ओव्हर

(1) श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड, 2012 टी20 विश्वचषक – टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला सुपर ओव्हर 2012 विश्वचषकादरम्यान झाला होता. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेलेला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं 7 गड्यांच्या मोबदल्यात 174 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेनंही 174 धावा केल्या. यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेनं 13 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात लसिथ मलिंगाच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर किवी संघ केवळ 7 धावाच करू शकला.

(2) वेस्ट इंडीज विरुद्ध न्यूझीलंड, 2012 टी20 विश्वचषक – याच विश्वचषकात पहिल्या सुपर ओव्हरनंतर अवघ्या पाच दिवसांनी आणखी एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली. यावेळीही यात न्यूझीलंडचा संघ सहभागी होता. त्यांच्यासमोर दुसरा संघ होता वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 139 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडलाही 139 धावाच करता आल्या. यानंतर किवी संघानं सुपर ओव्हरमध्ये 17 धावा केल्या, ज्या वेस्ट इंडिजनं सहज गाठल्या.

(3) नामिबिया विरुद्ध ओमान, 2024 टी20 विश्वचषक – टी20 विश्वचषक 2024 मध्ये नामिबिया आणि ओमान यांच्यात खेळला गेलेला सामना खूपच रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना ओमाननं 19.4 षटकांत केवळ 109 धावा केल्या. नामिबिया हे लक्ष्य सहज गाठेल असं वाटत होतं. मात्र, ओमानच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर नामिबियाला केवळ 109 धावा करता आल्या आणि सामना बरोबरीत सुटला. यानंतर सुपर ओव्हरमध्ये नामिबियानं 21 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात ओमानचा संघ फक्त 10 धावाच करू शकला.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी20 विश्वचषकात 12 वर्षांनंतर सुपर ओव्हरचा थरार! नामिबियाचा ओमानवर रोमहर्षक विजय
नामिबियाच्या रुबेन ट्रम्पेलमननं रचला इतिहास! टी20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
वेस्ट इंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामना, चर्चा मात्र हार्दिक पांड्याची! नेमकं काय घडलं जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---