---Advertisement---

वातावरणाने अडथळा आणल्यास कसे लागणार प्लेऑफ सामन्यांचे निकाल? वाचा आयपीएलचे नवे नियम

On: सोमवार, मे 23, 2022 5:29 PM
Sanju-Samson-Hardik-Pandya
---Advertisement---

आयपीएल २०२२ चे प्लेऑफचे सामने मंगळवार म्हणजेच २४ मे पासून सुरू होणार आहेत. प्लेऑफ फेरीतील सामन्यांमध्ये जर हवामानामुळे काही बाधा आली, तर सुपर ओव्हरचे आयोजन केले जाणार आहे. सुपर ओव्हर जर बरोबरीत सुटली, तर अजून एक सुपर ओव्हर टाकली जाईल. क्वालीफायर आणि एलिमिनेटरच नाही, तर अंतिम सामन्यात देखील हे नियम लागू असतील.

प्लेऑफच्या सामन्यांमध्ये (IPL Playoffs) जर हवामान बिघडले, तर शक्य असल्यास शेवटी एका षटकाचा म्हणजेच सुपर ओव्हरचा सामना खेळवला जाईल. परंतु, सुपर ओव्हर देखील होऊ शकली नाही, तर मात्र साखळी फेरीच्या गुणतालिकेच्या आधारावर सामन्याचा निकाल जाहीर केला जाईल. सध्या कोलकाता आणि अहमदाबादमध्ये वातावरण खराब दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर हे नियम बनवले गेले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---