---Advertisement---

चाहत्याचा शाहरुखला कोहलीबद्दल ‘तो’ प्रश्न; किंग खान म्हणाला, ‘माझं विराटवर खूप प्रेम, तो तर जावयासारखा…’

On: गुरूवार, सप्टेंबर 28, 2023 12:04 PM
Virat-Kohli-And-Shahrukh-Khan
---Advertisement---

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि क्रिकेट याचे खूप जवळचे नाते आहे. कारण, इंडियन प्रीमिअर लीगसह जगातील वेगवेगळ्या टी20 क्रिकेट लीगमध्ये शाहरुखच्या मालकीचे संघ खेळतात. एवढंच नाही, तर शाहरुख भारतीय संघाचा असो किंवा आयपीएल अनेक क्रिकेट सामन्यांना हजेरी लावतानाही दिसतो. आयपीएल 2023मध्येही शाहरुखने स्टेडिअममध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने विराट कोहली याची गळाभेट घेत त्याच्यासोबत डान्सही केला होता. अशात आता शाहरुखने सोशल मीडियावर विराट कोहली याच्याबद्दल मोठे विधान केले आहे.

शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या ‘जवान’ या सिनेमाच्या यशाचा आनंद लुटत आहे. त्याचा ‘पठाण’ (Pathaan) सिनेमापाठोपाठ ‘जवान’ (Jawan) सिनेमाही ब्लॉकबस्टर ठरला आहे. अशातच शाहरुखने चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ट्विटरवर #Asksrk सेशन ठेवले होते. यादरम्यान चाहत्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले. यादरम्यान एक प्रश्न असा होता, ज्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे नाव आले. या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुखने विराटला आपला जावई म्हटले.

खरं तर, दीर्घ काळापासून सोशल मीडियावर विराट कोहली आणि शाहरुख खान (Virat Kohli And Shahrukh Khan) यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे की, दोघांपैकी कोणता स्टार सोशल मीडियाचा किंग आहे. मात्र, विराट आणि शाहरुख यांच्यातील चांगले नाते कुणापासूनही लपून राहिले नाहीये. अशातच जेव्हा सेशनवर शाहरुखला विराटशी संबंधित प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याने आपल्या उत्तराने सर्वांची मने जिंकली.

युजरने शाहरुखला विचारले की, “विराट कोहली याच्याबाबत काहीतरी सांगा. दरदिवशी आम्हाला चाहत्यांमध्ये युद्ध पाहायला मिळते. जवान स्टाईलमध्ये विराटबद्दल काहीतरी बोला.” या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुखने लिहिले की, “माझं विराट कोहलीवर प्रेम आहे. तो माझा जवळचा आहे. मी नेहमी त्याच्या भल्यासाठी प्रार्थना करतो. तो माझ्या जावयासारखा आहे.”

शाहरुखने भारतीय संघाला विश्वचषकासाठी दिल्या शुभेच्छा
याच सेशनदरम्यान एका युजरने शाहरुखला आगामी वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा देण्याचीही विनंती केली. यावर शाहरुखने उत्तर देत म्हटले की, “इंडिया…इंडिया. सर्व खेळाडूंना शुभेच्छा. तुमचा विश्वचषक शानदार राहो. खूप खूप शुभेच्छा…!!!”

विश्वचषकाविषयी थोडक्यात
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघ स्पर्धेतील अभियानाला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे खेळला जाणार आहे. (superstar shah rukh khan call virat kohli his son in law reacts on icc odi world cup 2023 on asksrk session)

हेही वाचा-
वर्ल्डकपसाठी नव्या-जुन्या खेळाडूंना घेत बलाढ्य संघांनी कसली कंबर! पाहा दहाच्या दहा Teamsचे Squad
भारतीय संघाला घाम फोडणाऱ्या ‘त्या’ दोघांना कमिन्सने दिले विजयाचे श्रेय; म्हणाला, ‘त्यांच्यामुळे…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---