ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी संपूर्ण क्रिकटजगतासाठी निराश करणारी होती. एक क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांची ओळख सर्वांना ज्ञात आहे. भारतीय संघासोबतही एलिझाबेथ द्वितीय यांचे संबंध खास होते. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भारतातूनही श्रद्धांजली अर्पण केली जातेय. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या सोशल मीडिया हँडलवर एलिझाबेथ यांचा एक जुने छायाचित्र शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखावटा जाहीर केला गेला होता. भारतातील अनेक सेलिब्रिटी तसेच पंतप्रधानांनी देखील राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली अर्पण केली. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक जुने छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रमध्ये राणी 1946 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाशी हस्तांदोलन करताना दिसतायेत. माजी भारतीय कसोटीपटू सदू शिंदे यांच्याशी हात मिळवतानाचे हे छायाचित्र आहे. सदु शिंदे हे सुप्रिया सुळे यांच्या आई प्रतिभाताई यांचे वडील होत. सुळे यांनी पोस्ट केलेल्या या छायाचित्राला कॅप्शन देत लिहिले,
‘जुन्या आठवणी- माझे दिवंगत आजोबा सदू शिंदे यांना राणी एलिझाबेथ यांना भेटण्याची 1946 मध्ये संधी मिळाली होती.’
सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कन्या आहेत.
सदू शिंदे यांनी भारतीय संघासाठी 7 कसोटी सामने खेळले होते. लेगस्पिनर असलेल्या शिंदे यांनी 1946 मध्ये इंग्लंड दौऱ्यावरच आपले पदार्पण केलेले. आपल्या 6 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना 12 बळी मिळवण्यात यश आले. महाराष्ट्रासाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळताना त्यांच्या नावे 230 बळींची नोंद आहे. एका दूर्धर आजारात त्यांचे वयाच्या केवळ 32 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ पुणे येथे आजही सदू शिंदे मेमोरियल क्रिकेट स्पर्धा खेळवली जाते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी नेहराने निवडला भारताचा संघ, टीमबाहेर असलेल्या ‘या’ गोलंदाजाला संधी
कोहलीचा क्लास गांगुलीपेक्षा वरचढं! खुद्द ‘दादा’नेच केलं स्पष्ट






