---Advertisement---

चियरलीडर्सला पाहून कोणता खेळाडू विचलित होतो?, कपिल शर्माच्या प्रश्नावर रैनाचे भन्नाट प्रत्युत्तर

On: गुरूवार, नोव्हेंबर 19, 2020 4:58 PM
---Advertisement---

नवी दिल्ली। भारताचा लोकप्रिय विनोदी कलाकार कपिल शर्मा हा त्याच्या भन्नाट हास्यविनोदांसाठी ओळखला जातो. सोनी चॅनेलवरील ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना त्याच्या विचित्र प्रश्नांनी पेचात टाकतो. माजी भारतीय फलंदाज सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियंका रैना या शोमध्ये पाहुणे म्हणून दाखल झाले होते. या कार्यक्रमादरम्यान कपिलच्या प्रश्नाला उत्तर देताना रैनाने एक खुलासा केला.

चियरलीडर्सला पाहून कोणता खेळाडू विचलित होतो?
रैनाने या वादग्रस्त प्रश्नाचे चतुराईने उत्तर दिले. खेळाडू चीअरलीडर्सला पाहू शकत नाही, असे म्हणत त्यांने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. तो म्हणाला की, “जेव्हा खेळाडू चौकार किंवा षटकार ठोकतात, तेव्हा केवळ थोड्या काळासाठी चिअरलीडर्स स्क्रीनवर दिसतात. त्या केवळ प्रेक्षकांसाठी नृत्य करतात.”

“आम्ही त्यांना पाहू शकत नाही. कारण आम्हाला सामन्यावर लक्ष केंद्रित करावे लागते. जेव्हा आम्ही नाणेफेक करायला मैदानावर जातो, तेव्हा आम्हाला त्यांची कामगिरी पाहायला मिळते. त्या सुद्धा सायंकाळी साडेसात वाजता मैदानात येतात,” असा खुलासा रैनाने केला.

पती शून्यावर बाद झाल्यास पत्नीची प्रतिक्रिया काय असेल?
दरम्यान, सुरेश रैना आणि प्रियंकाशी संवाद साधताना कपिलने प्रियंकाला विचारले की, सामन्यादरम्यान खेळाडूंच्या बायका एकत्र बसल्या आहेत आणि जर पती फलंदाजी करताना शून्यावर बाद झाला, तर तुमची प्रतिक्रिया कशी असते? त्याने पुढे असेही विचारले की पती बाद झाल्यानंतर पत्नी शॉपिंगसाठी निघून जाते का? यावर प्रियंकाने उत्तर दिले, “नाही, आम्हाला संघाला पाठिंबा द्यावा लागतो.”

“असे अनेक वेळा घडले असावे. परंतु ती राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर ही बाब उघडपणे बोलत नाही,” असे बोलून रैनाने त्याच्या पत्नीची मजा घेण्याचा प्रयत्न केला.

ऑगस्टमध्ये रैनाने घेतली निवृत्ती
माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीबरोबर 15 ऑगस्ट 2020 रोजी रैनानेही अचानक सेवानिवृत्तीची घोषणा केली होती. सुरेश रैनाच्या या निर्णयामुळे चाहतेही आश्चर्यचकित झाले होते.

काही दिवसांपूर्वी तो आयपीएलमध्ये एकही सामना न खेळता मायदेशी परतला होता. त्यामुळे त्याची बरीच चर्चा झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

इरफान पठाण ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या संघाकडून खेळणार क्रिकेट, तेही भारतात नाही तर…

दक्षिण आफ्रिका-इंग्लंड क्रिकेट मालिकेवर कोरोनाचं सावट; खेळाडू आढळला पॉझिटिव्ह

विराट कोहलीचे मोठे मन! महाराष्ट्रातील दहा हजार कुपोषित मुलांच्या मदतीसाठी केला हात पुढे

ट्रेंडिंग लेख-

…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात

हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश

पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---