---Advertisement---

चिन्ना थाला इज बॅक! धोनी पाठोपाठ रैनाही चेन्नईत दाखल, जाणून घ्या केव्हा होणार युएईला रवाना

On: बुधवार, ऑगस्ट 11, 2021 11:07 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये सध्या ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका संपल्यानंतर, येत्या १९ सप्टेंबर पासून यूएईमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचा थरार रंगणार आहे.या स्पर्धेसाठी संघातील खेळाडूंनी एकत्र यायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एमएस धोनीने चेन्नईमध्ये पोहचला आहे. आता संघातील आणखी एका खेळाडूने युएईला रवाना होण्यासाठी चेन्नईमध्ये हजेरी लावली आहे.

भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा विश्वासू खेळाडू सुरेश रैना याने मंगळवारी (१० ऑगस्ट ) चेन्नईमध्ये हजेरी लावली आहे. ज्याची माहिती चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. यापूर्वी ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार एमएस धोनीने देखील चेन्नईमध्ये हजेरी लावली आहे.

सीएसके संघाचे विशेष कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी म्हटले की,” भारतीय खेळाडू १३ ऑगस्ट रोजी युएईला रवाना होऊ शकतात. तसेच चेन्नईमध्ये या खेळाडूंच्या सराव शिबिराचे आयोजन करण्यात येणार नाही. बायो सिक्युर बबल प्रोटोकॉल नुसार,युएई, दुबई आणि अबू धाबीला रवाना होण्यापूर्वी खेळाडूंना विलगीकरणात राहण्याची आवश्यकता नाही. परंतु चेन्नई सुपर किंग्स संघाला कोणताही धोका पत्करायचा नाही आणि म्हणून संघव्यवस्थापनाने आपल्या खेळाडूंना सेल्फ आयसोलेट होण्यास सांगितले आहे.”(Suresh raina arrives in Chennai after ms Dhoni know when team squad leaves for uae)

आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील २९ सामने यशस्वीरित्या पार पडल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी, चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत १० गुणांसह दुसऱ्या स्थानी होता. तर दिल्ली कॅपिटल्स संघ १२ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानी होता. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“… तर भारतीयांनी मला मारले असते” शोएब अख्तरचा खळबळजनक खुलासा

ताबडतोड फलंदाजी! अवघ्या २० चेंडूत ‘या’ फलंदाजाने फटकावल्या १०२ धावा, पाहा व्हिडिओ

लॉर्ड्स कसोटीला मुकणार अँडरसन? १४ वर्षानंतर घडणार ‘अशी’ घटना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---