चेन्नई। आयपीएल 2019 मध्ये बुधवारी(1 मे) एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात 50 वा सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 80 धावांनी विजय मिळवला.
चेन्नईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 179 धावा केल्या. चेन्नईच्या या डावात सुरेश रैनाने अर्धशतकी खेळी करताना 37 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार मारत 59 धावा केल्या. हे रैनाचे आयपीएलमधील 37 वे अर्धशतक ठरले आहे.
त्याचबरोबर त्याने क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी करताना दिल्ली संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉचा दिपक चहरच्या गोलंदाजीवर झेल घेतला. याबरोबरच त्याने या सामन्यात काही खास विक्रम केले आहेत.
या सामन्यात 180 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 16.2 षटकात 99 धावांवरच संपुष्टात आला.
रैनाने केले हे खास विक्रम विक्रम –
– रैनाने आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षण करताना 100 झेल पूर्ण केले आहेत. आयपीएल इतिहासात 100 झेल घेणारा रैना पहिला क्षेत्ररक्षक ठरला आहे.
-रैनाने आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्याच्या यादीत शिखर धवनची बरोबरी केली आहे. धवननेही आयपीएलमध्ये 37 अर्धशतके केली आहेत. त्यामुळे धवन आणि रैना या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे क्रिकेटपटू –
44 – डेव्हिड वॉर्नर
37 – सुरेश रैना, शिखर धवन
36 – विराट कोहली, गौतम गंभीर
– रैनाने बुधवारी दिल्ली विरुद्ध केलेले अर्धशतक हे त्याचे ट्वेंटी20 क्रिकेटमधील 50 वे अर्धशतक ठरले आहे. ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 50 अर्धशतके करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी विराट कोहली(60), रोहित शर्मा(54), गौतम गंभीर(53), शिखर धवन(53) यांनी हा पराक्रम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–ताहीरच्या सेलिब्रशनमध्ये सामील न होण्यामागच्या कारणाचा धोनीने केला खुलासा, पहा व्हिडिओ
–चपळ धोनीने केले तीन चेंडूत दोन स्टम्पिंग, पहा व्हिडिओ
–आयपीएलमध्ये आत्तापर्यंत या खेळाडूंनी घेतली आहे हॅट्रिक…