---Advertisement---

भारतीय संघासाठी या ३ टी-२० सामन्यात सुरेश रैना होता कर्णधार

On: शनिवार, ऑगस्ट 22, 2020 9:35 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाच्या मधल्या फळीतील स्टार फलंदाजांपैकी एक सुरेश रैना नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाला. संघ सहकारी माजी कर्णधार एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर सुरेश रैनाने आपली क्रिकेट कारकीर्द थांबविण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांपासून सुरेश रैना भारतीय संघातून बाहेर होता.

पण रैनाने भारतासाठी तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळला आहे, विशेषतः त्याची कसोटी क्रिकेटपेक्षा टी-२० आणि वनडे कारकीर्दी शानदार राहिली. या दोन्ही प्रकारामध्ये रैना भारतासाठी खूप उपयुक्त फलंदाज असल्याचे सिद्ध झाले.

कारकीर्दीत सुरेश रैनाला भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याची काही सामन्यांमध्ये संधीही मिळाली. कारकीर्दीत त्याने ७८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले, त्यात त्याला तीन वेळा कर्णधारपदाची संधी मिळाली. जाणून घेऊया कोणते आहेत ते ३ टी-२० सामने ज्यात
सुरेश रैनाने भारतीय संघासाठी कर्णधार म्हणून कामगिरी बजावली.

विशेष म्हणजे रैना हा भारताचा सर्वात युवा टी-२० कर्णधार आहे.

हे ३ टी-२० सामने ज्यामध्ये सुरेश रैनाला भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले-

पहिला सामना- वि. झिम्बाब्वे (२०१०)

२०१० मध्ये झिम्बाब्वेच्या दौर्‍यावर सुरेश रैनाला भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची पहिली संधी मिळाली. १२ जून २०१० रोजी सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या या पहिल्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ गडी गमावून १११ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने १५ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार सुरेश रैनाने तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करत २८ धावा केल्या. तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे फलंदाजही या सामन्यात सहभागी होते.

या सामन्यात नेतृत्व करणारा रैना भारताचा सर्वात कमी वयाचा कर्णधार ठरला होता. यावेळी त्याचे वय २३ वर्षे आणि १९१ दिवस इतके होते.

दुसरा सामना- वि. झिम्बाब्वे (२०१०)

२०१० मधील भारताच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसर्‍या सामन्यातही सुरेश रैना कर्णधार म्हणून मैदानात उतरला होता. हा सामना दुसऱ्याच दिवशी १३ जून २०१० रोजी खेळला गेला. या सामन्यात रैनाने कर्णधारपदाला साजेसा असा खेळ केला.

झिम्बाब्वेला पुन्हा एकदा भारतीय संघासमोर प्रथम फलंदाजीची संधी मिळाली.येथे झिम्बाब्वेने पहिल्या सामन्यापेक्षा चांगली कामगिरी करत प्रथम फलंदाजीमध्ये आणि २० षटकांत 5 गडी गमावून १४० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने शानदार कामगिरी करत १८ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले.

कर्णधार सुरेश रैनाने केवळ ४४ चेंडूत नाबाद ७२ धावा फटकावल्या. या सामन्यात रैनाने कर्णधारपदाची जबाबदारी उत्तम निभावली.

तिसरा सामना- वि. वेस्ट इंडीज (२०११)

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर सुरेश रैनाला टी-२० सामन्यात कर्णधारपदाची पुढील संधी २०११ मध्ये वेस्ट इंडिज दौर्‍यावर मिळाली. एमएस धोनीच्या अनुपस्थितीत सुरेश रैनाला १ सामन्याकरता कर्णधारपद मिळाले. पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरूद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करत भारताने ६ गडी गमावून १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडीज संघाने सर्वतोपरी प्रयत्न केले पण अखेर वेस्ट इंडीजने २० षटकांत ५ बाद १४३ धावा केल्या. अशाप्रकारे, भारताने हा सामना १६ धावांनी जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---