भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) याचे वडिल त्रिलोकचंद रैना (Suresh Raina’s Father) यांचे रविवारी (०६ फेब्रुवारी) निधन झाले आहे. दीर्घ काळापासून ते कँसर या आजाराशी लढत होते. अखेर त्यांनी रविवारी शेवटचा श्वास घेतला. आपल्या वडिलांच्या निधनानंतर रैना भावुक (Suresh Raina Emotional) झाला आहे. त्याने त्याच्या वडिलांच्या मृत्यूवर भावनिक अशी प्रतिक्रिया दिली आहे. आपण आपली सर्वात मोठी ताकद गमावली असल्याचे रैनाने म्हटले आहे.
रैनाचे वडिल त्रिलोकचंद (Tirlokchand Raina) हे निवृत्त भारतीय सैन्य अधिकारी होते. जवळपास १ वर्षे कँसरशी झुंज दिल्यानंतर त्यांची जगाचा निरोप घेतला आहे.
आपल्या वडिलांच्या निधनानंतर सोमवारी (०७ फेब्रुवारी) भावुक झालेल्या रैनाने ट्वीटरवर त्यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘वडिलांना गमावल्याचं दु:ख शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. काल माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्यासंगे माझी सपोर्ट सिस्टिमही मला सोडून गेली आहे. त्याच्यासोबत माझी पूर्ण ताकद गेली आहे. ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जिवनाशी लढत राहिले. देव तुमच्या आत्म्यास शांती देवो. तुमची पोकळी नेहमीच जाणवेल.’
No words can describe the pain of loosing a father. Yesterday, on passing away of my father, I also lost my support system, my pillar of strength. He was a true fighter till his last breath. May you rest in peace Papa. You will forever be missed. pic.twitter.com/9XcrQZeh2r
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) February 7, 2022
रैनाच्या वडिलांच्या निधनानंतर माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग याने ट्वीट करत त्याच्या कुटुंबियाप्रती सांत्वना व्यक्त केली आहे.
Very sad to hear Suresh Raina’s father @ImRaina RIP uncle ji 🙏🙏
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 6, 2022
त्रिलोकचंद यांना सुरेश रैनासह एकूण ४ मुले आहेत. या ४ पैकी दोघे मुले असून त्यांची नावे सुरेश आणि दिनेश आहेत. तर उर्वरित २ मुली आहेत.
सुरेश रैनासाठी २०२२ वर्ष जास्त चांगले राहिलेले नाही. त्याला त्याची आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जने रिटेन केलेले नाही. त्यामुळे रैनाला मेगा लिलावात उतरावे लागले आहे. त्याने २ कोटींच्या मूळ किंमतीसह मेगा लिलावात आपले नाव नोंदवले आहे. त्याच्याकडे आयपीएलचा बराच अनुभव आहे. त्यामुळे नव्या फ्रँचायझींसह इतर संघांच्याही त्याच्यावर नजरा असतील.
रैना २००८ पासून आयपीएलचा भाग आहे. तेव्हापासून चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात लायन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने २०५ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५५२८ धावा आणि २५ विकेट्सही घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“जर तुम्ही चांगले व्यक्ती असाल तर लोक जवळ करतील आणि..” वाचा असे का म्हणाला विराट कोहली
अंडर १९ संघातील ‘हा’ खेळाडू भविष्यात घेऊ शकतो विराट कोहलीची जागा, दिग्गजाने केले भाष्य