आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी (ICC Champions Trophy 2025) भारतीय संघ घोषित झाला आहे. या मेगा स्पर्धेसाठी भारतीय संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसणार आहे. तर युवा प्रतिभावान खेळाडू शुबमन गिलला (Shubman Gill) उपकर्णधार पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयाला माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) योग्य ठरवले आहे. एवढेच नाही, तर त्याने गिलची तुलना दिग्गज खेळाडू विराट कोहलीची (Virat Kohli) केली आहे.
स्टार स्पोर्ट्स द्वारा आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुरेश रैना (Suresh Raina) म्हणाला की, “माझ्या मते शुबमन गिल हा भारताचा पुढचा सुपरस्टार आहे. त्याने वनडे संघात चांगली कामगिरी केली आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या युवा खेळाडूला चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी उपकर्णधार बनवल्यासारखी चांगली संधी देता, तेव्हा त्यातून क्षमता दिसून येते. पुढचा कर्णधार कोण? हे रोहित शर्माला स्पष्टपणे माहित आहे.”
पुढ बोलताना रैना म्हणाला की, “शुबमन गिल हा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. विशेषत: ज्या प्रकारे त्याने गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व केले. गेल्या 12-16 महिन्यात त्याने ज्या प्रकारे कामगिरी केली आहे. त्याला उपकर्णधार करण्याचा निर्णय योग्य आहे. रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी उत्कृष्ट निर्णय घेतला आहे. विराट कोहलीप्रमाणे शुबमन गिलही संघाचे नेतृत्व करतो. असे निरीक्षण रोहितने नोंदवले आहे. गिलला खेळाची चांगली समज आहे.”
शुबमन गिलच्या वनडे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीदबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 47 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 47 डावात फलंदाजी करताना 58.20च्या सरासरीने 2,328 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 101.74 राहिला आहे. वनडेमध्ये गिलने 13 अर्धशतकांसह 6 शतके आणि 1 द्विशतक देखील झळकावले आहे. वनडेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या 208 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीतून का वगळण्यात आलं? खरं कारण जाणून घ्या
लज्जास्पद! अवघ्या 23 धावांवर संपूर्ण संघ ऑलआऊट, 6 फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही
खूप झाला आराम…रोहित, जडेजासह हे खेळाडू रणजी ट्रॉफी खेळणार; कोहली अजूनही विश्रांतीवर