कार्डीफ। आज 6 जुलैला भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा टी20 सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा टी20 स्पेशालिस्ट सुरेश रैनाला टी20 क्रिकेटमध्ये 300 षटकार मारण्याची संधी आहे.
सध्या रैनाने 294 टी20 सामन्यात 298 षटकार मारले आहेत. त्यामुळे त्याला 300 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 2 षटकारांची आवश्यकता आहे.
जर त्याने हा टप्पा पार केला तर तो टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणारा रोहित शर्मानंतरचा दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरेल. त्याचबरोबर आत्तापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त षटकार फक्त 7 खेळाडूंनी मारले आहेत.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने मारले आहेत. त्याने 335 सामन्यात तब्बल 846 षटकार मारले आहेत.
या यादीत 308 षटकारांसह भारताचा रोहित शर्मा 7 व्या स्थानी आहे. तर सुरेश रैना 9 व्या स्थानी आहे. 300 षटकारांबरोबरच रैनाला आज या यादीत 299 षटकारांसह 8व्या स्थानी असणाऱ्या एबी डेविलियर्सला मागे टाकण्याचीही संधी आहे.
रैनाने आत्तापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 294 सामन्यात 33.62च्या सरासरीने 7902 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 707 चौकार आणि 298 षटकारांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-धोनीसाठी ५००वा सामना तर विराटला जगातील सर्वात खास विक्रम करण्याची संधी
-भुवनेश्वर-कुलदीप हे वागणं बरं नव्हे; इंग्लंडचा क्रिकेटपटू कडाडला
-आजचा सामना धोनीसाठी ठरणार खास; वाढदिवसाच्या एक दिवस आधीच मिळणार ग्रेट भेट