जेव्हाही कोणती मोठी स्पर्धा तोंडावर येते, तेव्हा माजी क्रिकेटपटू भविष्यवाणी करण्यासाठी सज्ज होतात. अशात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला दोन आठवड्यांचा कालावधी उरला आहे. स्पर्धेपूर्वीच भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना याने मोठी भविष्यवाणी केली आहे. खरं तर, त्याने सांगितले आहे की, यावेळी विश्वचषकात कोणता खेळाडू मोठी भूमिका बजावू शकतो.
काय म्हणाला रैना?
भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) याच्या मते, 2019 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) याने ज्याप्रकारे प्रदर्शन केले होते, तशीच फलंदाजी यावेळी शुबमन गिल (Shubman Gill) करू शकतो. त्याच्यानुसार, हा युवा खेळाडू पुढील विराट कोहली (Virat Kohli) बनू शकतो.
जिओ सिनेमाच्या एका कार्यक्रमात बोलताना रैना म्हणाला, “गिल विश्वचषकातील सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असेल. मला माहिती आहे की, त्याला सुपरस्टार बनायचे आहे. तसेच, त्याला पुढील विराट कोहली बनायचे आहे. तो आधीपासूनच त्या अंदाजात आहे आणि या विश्वचषकानंतर आपण याबाबत अधिक चर्चा करू. फिरकीपटूंना माहिती नाही की, त्याला कुठे गोलंदाजी करायची आहे. तसेच, वेगवान गोलंदाजांनी चेंडू स्विंग केला नाही, तर तो त्याला थेट किंवा फ्लिक करून वास्तवात चांगल्याप्रकारे खेळू शकतो.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “तो इथेच थांबणार नाही. सन 2019च्या विश्वचषकात रोहित शर्माने जे केले, यावर्षी गिल भारतासाठी तसेच करू शकतो. त्याला फलंदाजी करताना 50 षटके मिळतील. त्यामुळे त्याच्या फलंदाजीसाठी ही भरारी घेण्याची संधी असेल. मला वाटते की, तो जन्मापासूनच लीडर आहे आणि तो हे आपल्या खेळातूनही दाखवतो.”
रैना असेही म्हणाला, “तो मागील दीड वर्षांपासून सातत्याने चांगले प्रदर्शन करत आहे. होय, वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला संघर्ष करावा लागला. मात्र, त्याने ज्याप्रकारे पुनरागमन केले आणि आशिया चषकात सर्वोत्तम धावा केल्या, ते शानदार आहे. तो सकारात्मक दिसत आहे. चांगल्या फुटवर्कचा वापर करत आहे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 40 धावांवर बाद झाल्यानंतर आता तो आरामात 50 आणि 100 धावाही करत आहे.”
रोहितने ठोकलेली 5 शतके
रोहित शर्मा 2019च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करणारा फलंदाज होता. त्याने 9 सामने खेळताना 81च्या सरासरीने 648 धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने सर्वाधिक 5 शतकांचा पाऊस पाडला होता. तसेच, 1 अर्धशतकही रोहितने केले होते.
गिलने गाजवले आशिया चषक 2023
दुसरीकडे, गिल याने आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला आहे. गिलने 6 सामने खेळताना 75.50च्या सरासरीने 302 धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतकेही झळकावली. (suresh raina on shubman gills performance said he wants to be the next virat kohli read here)
हेही वाचाच-
अर्रर्र! ऑस्ट्रेलियाचे ‘हे’ 2 स्टार खेळाडू भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेला मुकणार, कर्णधारानेच दिली माहिती
लेक चालली सासरी! आफ्रिदी झाला भावूक, जावई अन् मुलीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला…