भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना निवृत्त होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. यावर्षी आयपीएलमध्ये देखील त्याला कोणीही खरेदी केले नव्हते. मात्र, आता तो पुन्हा एकदा मैदानावर परतण्याचे संकेत मिळत आहेत. त्याने नुकताच आपला इंस्टाग्राम हॅण्डलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सराव करताना दिसतोय.
https://www.instagram.com/reel/CiH8h5euidM/?igshid=YmMyMTA2M2Y=
रैनाने नुकताच आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो सराव करताना दिसतोय. व्हिडिओच्या सुरुवातीला, रैना प्रथम तीन बॅट्स घेऊन मैदानात येतो. त्यानंतर त्याच्या नेहमीच्या शैलीत गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरूवात करतो. दरम्यान, तो फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याचा आवडता इनसाईड आऊट फटका खेळतानाही दिसला आहे. रैनाचे शानदार फटके पाहून त्याचे चाहते तो पुन्हा मैदानात परतावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. विशेष म्हणजे रैनाने चेन्नई सुपर किंग्जची (CSK) जर्सी घातली आहे. यादरम्यान तो अत्यंत तंदुरुस्त दिसून येते. तसेच हा व्हिडिओ गाजियाबादच्या आरपीएल मैदानाचा असल्याचे सांगितले जातेय.
सुरेश रैना याने 15 ऑगस्ट 2022 रोजी एमएस धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. मात्र, तो आयपीएलमध्ये खेळताना दिसला. 2021 मध्ये आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा तो भाग राहिला होता. मात्र, पुढील वर्षी त्याला संघाने रिटेन न करण्याचा निर्णय घेतला. तसेच लिलावातही त्याच्यावर बोली लावली नाही. त्यानंतर तो आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसला होता. परंतु आता तो पुन्हा एकदा सराव करताना दिसल्याने, चाहते त्याच्या पुनरागमनाकडे आस लावून बसले असतील.
महत्वाच्या बातम्या –
जेमिमाला ‘बर्थ डे’ गिफ्ट! वुमेन्स आयपीएलमध्ये खेळणार मुंबई इंडियन्ससाठी?
VIDEO: जेव्हा टीम इंडिया हारत होती, तेव्हा पाकिस्तानच्या ड्रेसिंगरुममध्ये नक्की चाललं काय होतं?
रिषभ की कार्तिक? कोण आहे टीम इंडियाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक? चाहते विचारतायेत प्रश्न