भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैना साठी एक वाईट बातमी समोर आली आहे. रैनाचा सुपरफॅन विग्नेश याचे निधन झाले आहे. त्याच्या सुपरफॅनच्या निधनाची बातमी ऐकून रैनाला देखील खूप दुःख झाले आहे आणि सोशल मीडियावर त्याने याविषयी एक पोस्टही केले आहे. रैनाने विग्नेशच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या मागच्या अनेक हंगामांमध्ये विग्नेश (Superfan Vignesh) सुरेश रैना (Suresh Raina) याचे समर्थन करताना दिसला आहे. आयपीएलमध्ये रैना फलंदाजी करताना तो नेहमीच मैदानात उपस्थित असायचा आणि मोठ्याने नारेबाजीही करायचा. एवढेच नाही विग्नेश त्याच्या संपूर्ण शरीरावर पिवळा रंग लावून स्टेडियममध्ये जात असेल आणि शरीरावर रैना असे नावही लिहिलेले असायचे.
विग्नेशच्या निधनानंतर सुरेश रैनाने एक खास व्हिडिओ रिट्वीट केला आहे. त्याने लिहिले की, “तुझ्या आत्म्याला शांती मिळो विग्नेश! त्याच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.” व्हिडिओत विग्नेश रैनाने फलंदाजाला धावबाद केल्यानंतर जल्लोष करताना दिसत आहे. केकेआर आणि सीएसक यांच्यातील एका सामन्याचा हा व्हिडिओ आहे.
RIP brother @CricVignesh ????! My deepest condolences to the family. https://t.co/mbbhkbpJZY
— Suresh Raina???????? (@ImRaina) August 6, 2022
विग्नेशच्या निधनाची बातमी समोर येताच सीएसकेच्या फॅन ग्रुपने ट्वीटर वर याविषयी दुःख व्यक्त केले. ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “आमचे प्रिय मित्र ‘सुपरफॅन विग्नेश’ मागच्याकाही महिन्यांपासून एका आजाराशी झुंज दिल्यानंतर आता त्याने आराम घेतला आहे. त्याचे निधन झाले. त्याने रैना, सीएसके आणि भारतीय संघाच्या समर्थकाच्या रूपात स्वतःची छाप सोडली, जी आम्ही विसरणार नाही. मैदानात तुझी कमी जाणवेल, प्रिय विग्नेश.” रैनानेही हे ट्वीट रिट्वीट केले आहे.
Our dear friend ‘Superfan Vignesh’ had passed away after a short battle with an illness over the last few months and decided to rest now. He left an impression we will not forget with his support for Raina, CSK & TeamIndia.
Will miss you at the grounds. Dear Vignesh. #RIP pic.twitter.com/DcfGO0ZLzF
— WhistlePodu Army ® – CSK Fan Club (@CSKFansOfficial) August 5, 2022
दरम्यान सुरेश रैना आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात सहभागी झाला होता, मात्र त्याला एकाही संघाने खरेदी केले नाही. रैनाला खरेदी करण्यासाठी एकाही संघाने पुढाकार घेतला नसल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. चेन्नई सुपर किंग्ज त्याला खरेदी करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती, परंतु त्यांनीही रैनावार पैसे खर्च केले नाहीत. खेळण्याची संधी मिळाली नसल्यामुळे रैनाने नंतर समालोचकाची भूमिका पार पाडली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पती क्रिकेट तर पत्नी स्क्वॉशमध्ये करतेय भारताचे ‘नाव रोशन!’ वाचा कार्तिकच्या बायकोचा खास कारनामा






