आशियातील सर्वात मानाचे क्रिकेट स्पर्धा असलेला आशिया चषक शनिवारपासून (२७ ऑगस्ट) सुरू होत आहे. आशियातील सहा संघ या स्पर्धेत आपला दम दाखवतील. विराट कोहलीपासून नवख्या हाँगकाँगच्या खेळाडूंवर देखील सर्वांची नजर असेल. अनेक नवे विक्रम या आशिया चषकात बनू शकतात. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याचा एक विक्रम अजूनही अबाधित आहे.
आशिया चषकाच्या एका स्पर्धेचा विचार केल्यास ज्या खेळाडूने आपल्या संघाच्या विजयात सर्वाधिक धावांचे योगदान दिले आहे, त्या फलंदाजांच्या यादीत सुरेश रैना अव्वल स्थानावर दिसून येतो. रैनाने २००८ आशिया चषकात भारताने जिंकलेल्या सामन्यांमध्ये ३५५ धावा चोपल्या होत्या. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानीही भारतीय फलंदाज आहे. २०१८ आशिया चषकात शिखर धवनने भारताच्या विजयांत ३४२ धावांचे योगदान दिलेले. २००८ च्याच आशिया चषकात श्रीलंकेची अनुभवी जोडी कुमार संघकारा व सनथ जयसूर्या यांनी अनुक्रमे ३३८ व ३३५ धावांचे योगदान दिलेले. तर सध्या भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्मा याने २०१८ आशिया चषकात, भारताच्या विजयात ३१७ धावा केल्या होत्या.
आशिया चषक २०२२ साठी भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, दिनेश कार्तिक यांसारख्या अनुभवी फलंदाजांचा समावेश असून, रिषभ पंत व हार्दिक पंड्या त्यांना साथ देतील. गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल व भुवनेश्वर कुमार यांच्या साथीला युवा अर्शदीप सिंग व रवी बिश्नोई असतील. भारत २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरुद्ध आपल्या अभियानाला सुरुवात करेल.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ खेळाडूची लॉटरी, जायबंदी वेगवान गोलंदाजाच्या जागी आशिया चषकासाठी निवड?
Asia Cup 2022 | ‘या’ पाच कर्णधारांनी जिंकले आहेत सर्वाधिक सामने, यादीत एका भारतीयाचाही समावेश