जुलै महिन्यात पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी यो-यो टेस्टमध्ये फेल झालेल्या अंबाती रायडूच्या जागी सुरेश रैनाला संधी मिळाली आहे.
आपीयलमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे अंबाती रायडूला एकदिवसीय संघात संधी मिळाली होती. पण शुक्रवार दिनांक 15 जूनला राष्ट्रीय क्रिकेट आकादमी बेंगलोर येथे झालेल्या यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आहे.
रायडूच्या जागी इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या संघात एकदिवसीय मालिकेसाठी रविवार दि. 17 जूनला सुरेश रैनाची निवड समितीने निवड केली.
याचबरोबर रैनाला जवळ-जवळ तीन वर्षांनी एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. या तीन वर्षांच्या काळात भारतीय संघ ५३ सामने खेळला असून २०११च्या विश्वचषकात भारतीय संघात असलेल्या या खेळाडूला मात्र एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती.
असे असले तरी रैनाला अंतिम अकरा खेळडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी के.एल राहुल आणि युवा फलंदाज श्रेयस अय्यरशी स्पर्धा करावी लागणार आहे.
-महत्वाच्या बातम्या
-चेतेश्वर पुजारा करावे तेवढे कौतुक कमीच, क्रिकेटप्रती असलेले प्रेम पुन्हा दिसुन आले!
–स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात