भारत देशात सध्या कोरोना विळखा पडला आहे. या महामारीमुळे आतापर्यंत कितीतरी कुटुंबांनी आपल्या जवळच्या सदस्यांना गमावले आहे. नुकतेच माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यासाठी वाईट बातमी पुढे आली आहे. त्याची पत्नी प्रियंका चौधरी हिच्या आजीचे (आईच्या आईचे) काल (१० मे) निधन झाले आहे. प्रियंकाने सोशल मीडियाद्वारे यासंबंधी माहिती दिली आहे.
प्रियंकाच्या आजीला काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर जवळपास १० दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते. यावेळी विलग्नवासात असल्याने त्यांच्याशी कोणीही भेटू शकत नव्हते. अखेर काल सकाळी त्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत पराभूत झाल्या.
प्रियंकाने ट्विट करत आपला आजीसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यावर तिने लिहिले आहे की, ‘आम्ही शक्य तितके प्रयत्न केले परंतु काल सकाळी माझी आजी कोरोनाविरुद्धच्या लढाईत पराभूत झाली. मागील १० दिवसांपासून ती विगलीकरणात होती. तिथेच तिच्यावर उपचार चालू होते आणि आमच्यातील कोणीही तिला भेटू शकत नव्हते.’
We tried everything possible but my grandma (my Nani) lost her battle with COVID yesterday morning. Last 10 days she was under treatment in isolation & none of us could see her. I was just 9 yr old when she moved in with us & raised us all. I just can’t express how hollow I feel. pic.twitter.com/dNBZdQ0q8g
— Priyanka Chaudhary Raina (@PriyankaCRaina) May 11, 2021
‘मी ९ वर्षांची असताना ती आमच्यासोबत राहायला आली होती. तिनेच माझा सांभाळ केला आहे. मी शब्दात सांगू शकत नाही की ती गेल्याने मला किती एकटे वाटत आहे,’ असे तिने लिहिले आहे.
Last 10 days were terribly painful for all of us. We never felt so helpless & stranded. I wholeheartedly want to thank all the people who helped us through this difficult time – our friends, family, doctors, police, neighbours & even some strangers. Hope we all pass this soon. 🙏
— Priyanka Chaudhary Raina (@PriyankaCRaina) May 11, 2021
यापुर्वीही रैन कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. रैनाची काकू कोरोनामुळे त्रस्त होत्या. त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना फुप्फुसांचा गंभीर आजार झाला होता. यामुळे रैनाने ट्विट करुन मदतीची विनंती केली होती. यावेळी त्याने ऑक्सिजन सिलिंडरची मदत मागितली होती. तेव्हा कोरोना वायरसच्या संकटात संपूर्ण देशाला देवदूताप्रमाने मदत करणारा अभिनेता सोनू सूद त्याच्या मदतीसाठी धावून आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
“आता परदेशी खेळपट्ट्यांवरही विरोधकांना आमच्यापासून सावध राहावे लागेल”, मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य
‘हा’ १९ वर्षीय क्रिकेटपटू बनलाय राजस्थान रॉयल्सचा ‘धोनी’; कोहलीच्या सल्ल्याने दाखवलाय मार्ग
दुर्दैवचं अजून काय! अवघ्या ३ धावांनी हुकले फलंदाजाचे शतक, पाय क्रिजमध्ये असूनही झाला यष्टीचीत