---Advertisement---

लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून समाजसेवा करण्यात व्यस्त आहे या भारतीय क्रिकेटपटूची पत्नी

On: बुधवार, जुलै 15, 2020 11:20 AM
---Advertisement---

मुंबई । जगातला उत्तम क्षेत्ररक्षक आणि भारतचा स्टायलिश फलंदाज रैनाची पत्नी प्रियंका रैना ही गरीब कुटुंबांना मदत करत असते. त्यांच्या मुलीच्या नावावर एक फाऊंडेशन आहे. जे की सुरेश आणि प्रियांका दोघेही चालवतात.

या फाऊंडेशनसाठी प्रियांका सर्वाधिक योगदान देते. कारण सुरेश रैना क्रिकेट खेळण्यामध्ये व्यस्त असतो. क्रिकेटमधून जेव्हाही त्याला वेळ मिळतो. तो फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांची मदत करत असतो. वास्तविक पाहता प्रियांका ही बँकिंग सेक्टरमध्ये कामाला होती. तिला लाखो रुपयांचे वेतन मिळत होते. पण आज ती लाखो रुपयांच्या पॅकेजवर पाणी सोडत समाजसेवा करण्यात व्यस्त आहे.

भारताचा स्टार खेळाडू सुरेश रैना बरोबर लग्न करण्यापूर्वी प्रियांका नेदरलँड्स येथे बँकिंग सेक्टरमध्ये कामाला होती. तिने बीटेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक आयटी प्रोफेशन म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

सुरेश रैना आणि प्रियंका यांचे 2015 साली लग्न झाले. त्यांना पहिली मुलगी झाली. मुलगी ग्रेसियाच्या जन्मानंतर प्रियांका भारतात आली. भारतात आल्यानंतर हे दोघे रैना पती-पत्नी आपल्या मुलीच्या नावाने फाउंडेशन सुरू केले. गरीब मुलांना मदत करणे हा या फाऊंडेशनचा मुख्य उद्देश आहे.

हे फाउंडेशन महिलांना सक्षम बनवण्यासाठी तसेच मुलांच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यासाठी प्रेरित करते. तसेच गर्भवती महिलांना पोषक आहाराविषयी माहिती देऊन जागरूक करण्याचे काम फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जाते.

ट्रेंडिंग घडामोडी – 

खुशखबर! इंग्लंडनंतर आता या देशात होणार क्रिकेटचे पुनरागमन

तब्बल ३५ मुलांच्या हृदयाच्या सर्जरीसाठी ‘या’ माजी दिग्गजाने घेतला पुढाकार

या भारतीय क्रिकेटरचा मुलगा राहतो जंगलात; वाघांवर आहे विशेष प्रेम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---