भारताचा दिग्गज फलंदाज आणि मिस्टर आयपीएल नावाने प्रसिद्ध असलेला सुरेश रैना (Suresh Raina) याला यावर्षी एकाही आयपीएल फ्रेंचायझीने विकत घेतले नाही. यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे चाहते फ्रेंचायझीवर चांगलेच नाराज झाले होते. असे असले तरी रैना मात्र जराही उदास किंवा नाराज असल्याचे दिसत नाही. मेगा लिलावानंतर पहिल्यांदाच त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे.
मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेला रैना पहिल्यांचा चाहत्यांना या सोशल मीडिया पोस्टमधून दिसला आहे. एकाही फ्रेंचायझीने त्याच्यावर बोली न लावल्यानंतर रैनाने कसलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता त्याचा हा धासू लूकमधील फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. या फोटोत तो सर्वत्र चर्चेत असलेला चित्रपट ‘पुष्पा’ मधील अवतारात दिसत आहे. त्याची दाढीही वाढलेली आहे. पोस्टची सर्वात खास गोष्ट म्हणजे, त्याने दिलेले कॅक्शन. पोस्टच्या कॅप्शनमध्ये रैनाने लिहिले की, “फायर (ईमोजी मध्ये) आहे मी. तुम्हाला माहिती आहे की, हे काय आहे.”
🔥 है मैं 😎 You know what it is 😉 #funmodeon pic.twitter.com/Fdg70KMkxq
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 1, 2022
या पोस्टमधील सुरेश रैनाचा पुष्पा अवतार चाहत्यांना चांगलाचा भावला आहे. या पोस्टमधून रैनाने चाहत्यांना एकप्रकारे संदेशच दिला आहे की, त्याने अजूनही माघार घेतलेली नाहीय. पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स आणि मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळत आहेत. चाहते अंदाज बांधत आहेत की, मेगा लिलावात जरी त्याला कोणी खरेदीदार मिळाला नसला, तर येत्या काळात तो आपल्याला मैदानात खेळताना दिसणार आहे.
दरम्यान, आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या संघातील चार खेळाडूंना रिटेन करण्याची संधी दिली होती. अशाच चेन्नई सुपर किंग्ज रैनाना रिटेन करेल असा अनेकांचा अंदाज होता. पण फ्रेंचायझीने मात्र तसा विचार केला नाही आणि त्याला रिलिज केले. यानंतर चाहत्यांना असे वाटले होते की, फ्रेंचायझी रैनाला मेगा लिलावात बोली लावून विकत घेईल, पण तसेही झाले नाही. एवढेच नाही, दोन कोटी बेस प्राइस असलेल्या रैनावर कोणत्याही आयपीएल फ्रेंचायझीने विश्वास दाखवत पैसा खर्च केला नाही आणि तो अनसोल्ड राहिला. सीएसकेचे चाहते यानंतर फ्रेंचायझीवर चांगलेच नाराज दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
पूरन थांबायचे नाव घेईना! टी१० सामन्यातच ठोकले वादळी शतक; पाहा व्हिडिओ
आवेश खानबद्दल भारतीय दिग्गजाचा कर्णधार रोहितला सल्ला; “त्याने विराटप्रमाणे…”
हिटमॅनच्या ताफ्यात ‘ड्रीम कार’! कोट्यवधींची किंमत तर, वापरणारे मोजकेच भारतीय